AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुनिशा शर्मा हिला उर्दू शिकवायचा शीजान खान, अभिनेत्रीच्या आईने केले धक्कादायक खुलासे

आपल्या मुलीच्या आत्महत्येला शीजान खान हाच कारणीभूत असल्याचे परत एकदा तुनिशा शर्मा हिच्या आईने म्हटले आहे.

तुनिशा शर्मा हिला उर्दू शिकवायचा शीजान खान, अभिनेत्रीच्या आईने केले धक्कादायक खुलासे
| Updated on: Dec 29, 2022 | 7:16 PM
Share

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले. तुनिशा आणि शीजान खान अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये होते. तुनिशा हिने शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेतल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. आपल्या मुलीच्या आत्महत्येला शीजान खान हाच कारणीभूत असल्याचे परत एकदा तुनिशा शर्मा हिच्या आईने म्हटले आहे.

तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तुनिशाच्या आत्महत्येच्या 15 दिवस अगोदरच शीजान आणि तुनिशा यांचे ब्रेकअप झाले होते. यामुळे तुनिशा ही तणावामध्ये होती आणि यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

नुकताच तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीला माझ्यापासून शीजान खान याने दूर केल्याचा आरोप आता तुनिशाच्या आईने केला आहे. शीजानमुळे माझी मुलगी मला काहीच सांगत नव्हती असे त्यांनी म्हटले आहे.

तुनिशा शर्माच्या आईने यावेळी अजून एक गंभीर आरोप केला असून त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलीला शीजान खान आणि त्याचे कुटुंबिय उर्दू शिकवत होते. तोच नाहीतर त्याच्या घरातील लोकांसोबत त्याने तुनिशाचे एक रिलेशन तयार करून दिले होते.

तुनिशाची आई म्हणाली की, माझ्या मुलीला माझ्यापेक्षा ते जास्त जवळचे वाटत होते. मी तिला शीजान आणि तिच्या रिलेशनबद्दल विचारले तर तिने यावर उत्तर देणे टाळले होते नेहमीच. यांनी माझ्या मुलीलाच माझ्यापासून दूर केले होते.

तुनिशाची आई पुढे म्हणाली, मी या शीजान खानला सोडणार नाहीये….याच्यामुळेच माझी मुलगी मला आणि जगाला सोडून गेली आहे. याने फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा वापर करून घेतला आहे. शीजान खान याला शिक्षा झालीच पाहिजे.

मी यापूर्वी शीजान याला म्हटले होते की, तू दुसरीकडे रिलेशनशिपमध्ये आहेस तर तू हे सर्व तुनिशाला सांगून टाक…परंतू त्यावेळी तो मला म्हटला होता की, साॅरी आंटी मी तुमची काहीच मदत करू शकत नाही.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.