टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी काँग्रेसच्या वाटेवर, ‘मर्यादा लेकीन कब तक’ मालिकेतून मिळाली होती प्रसिद्धी!

अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Panjabi) ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठा चेहरा आहे. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, ती आपला निर्दोष दृष्टिकोन आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काम्याने अनेक शोमध्ये काम केले आहे. ईटीच्या वृत्तानुसार, अभिनेत्री  लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकते.

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी काँग्रेसच्या वाटेवर, ‘मर्यादा लेकीन कब तक’ मालिकेतून मिळाली होती प्रसिद्धी!
Kamya Panjabi
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 1:55 PM

मुंबई : अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Panjabi) ही टीव्ही इंडस्ट्रीतील एक मोठा चेहरा आहे. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, ती आपला निर्दोष दृष्टिकोन आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काम्याने अनेक शोमध्ये काम केले आहे. ईटीच्या वृत्तानुसार, अभिनेत्री  लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकते. याबाबत ती लवकरच घोषणा करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काम्याला नेहमीच राजकारणात यायचे होते. पण तिच्या कामामुळे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे ती या गोष्टींपासून दूर होती. आता तिचा ‘शक्ति अस्तित्व के एहसास की’ हा शो संपल्याने तिने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या गोष्टींबाबत काम्या पंजाबीकडून कोणतीही पुष्टी झालेली नाही.

काम्या म्हणाली, ‘शक्तीचा दुसरा सीझन येऊ शकतो’

अभिनेत्रीने तिच्या जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ पाच वर्षांनंतर बंद झाला आहे. तिने सांगितले की, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी जेव्हा दिग्दर्शकाने पॅकअप करायला सांगितले, तेव्हा मी खूप रडलो. मी कित्येक तास सेटवर होते. शक्ती हा एक ब्रँड आहे, ज्याची सुरुवात चांगली झाली आणि योग्य वेळी संपली. ती पुढे म्हणाली की, जो तुम्हाला दूर ढकलतो त्यापेक्षा तुम्ही सन्मानाने निघून जाणे चांगले. अनेक शोचे दुसरे सीझन येत आहे. मला वाटतं शक्तीचा दुसरा सीझनही लवकरच येईल.

काम्या पंजाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय!

अभिनेत्री काम्या पंजाबी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकताच तिच्या पतीसोबत करवा चौथ साजरा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. करवा चौथच्या खास मुहूर्तावर अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. अभिनेत्रीने अनेक फोटो शेअर केले होते, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय काम्या ‘बिग बॉस 15’च्या स्पर्धकांबद्दलही आपले मत मुक्तपणे व्यक्त करते.

अभिनेत्री गेल्या दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने ‘बनू में तेरी दुल्हन’, ‘मर्यादा लेकीन कब तक’ आणि ‘बेंतिहा’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने ‘बिग बॉस 7’ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात

अभिनेत्री काम्या पंजाबीला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे. “कहता है दिल”, “सीआयडी”, “रेत”, “वो रहने वाली महल की” सारख्या सर्व मालिकांमध्ये तिनं उत्तम काम केलं आहे. ज्यामुळे तिनं प्रेक्षकांच्या घरात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलते, हे फार दुर्मिळ आहे. काम्यानं तिच्या पूर्वीच्या लग्नात खूप वाईट दिवस पाहिले होते, ज्यामुळे तिनं 2013 मध्ये हे नातं तोडलं आणि नंतर 2020 मध्ये शलभ डोंगशी लग्न केलं.

हेही वाचा :

आलिया भट्ट-रणबीर कपूर डिसेंबरमध्ये लग्नबेडीत अडकणार? चित्रपटांचे चित्रीकरण ढकलले पुढे!

Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ-विकी कौशल अडकणार लग्नबंधनात?; सब्यसाचीने डिझाइन केले लग्नाचे कपडे!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.