‘मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?’, श्वेता तिवारी भडकली

अभिनेत्री श्वेता तिवारी तिचं लग्न, पती, वैयक्तिक आयुष्य, तिची विधानं अशा नानाविध गोष्टींमुळे चर्चेत असते. तिच्याबद्दल सोशल मीडियावर चवीनं बोललं जातं. आता श्वेताच्या तिसऱ्या लग्नाचा विषय चर्चेत आहे.

'मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?', श्वेता तिवारी भडकली
श्वेता तिवारी
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 9:41 AM

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिचं लग्न, पती, वैयक्तिक आयुष्य, तिची विधानं अशा नानाविध गोष्टींमुळे चर्चेत असते. तिच्याबद्दल सोशल मीडियावर चवीनं बोललं जातं. आता श्वेताच्या तिसऱ्या लग्नाचा विषय चर्चेत आहे. तेही श्वेताच्या स्वत: च्या विधानामुळं. श्वेता तिवारीने नुकतंच एका मुलाखती दरम्यान एक विधान केलं, जे सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंडिंग आहे. श्वेता आपल्या तिसऱ्या लग्नाबाबत बोलती झाली. “मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?”, असा परखड सवाल श्वेता तिवारीने विचारला आहे. या मुलाखती दरम्यान ती बऱ्याच मुद्द्यांवर बोलली. एकेरी पालकत्वाच्या मुद्द्यावरही ती बोलली. तिची ही मुलाखत आणि त्यातील मुद्दे सध्या चर्चेत आहेत.

तिसऱ्या लग्नाबाबत काय म्हणाली?

श्वेता तिवारी तिच्या तिसऱ्या लग्नाबाबत बोलती झाली. “मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?”, असा परखड सवाल श्वेता तिवारीने विचारला आहे. “तुम्हाला विचारून लग्न करू का? तुम्ही माझ्या लग्नाचा खर्च करणारा आहात का?, तुम्ही कोण आहात? जे मला सांगताहेत की तिसरं लग्न करू नको. तो माझा निर्णय आहे, मला तिसरं लग्न करायचं आहे की नाही की मला संन्यास घ्यायचा आहे. ते मी ठरवेन”, असं श्वेता म्हणाली आहे.

“तुझी मुलगी 5 लग्न करेन”

“लोक मला म्हणतात, मी दोन लग्न केलीत तर माझी मुलगी 5 लग्न करेन. अरे पण ती ज्या परिस्थितीतून गेली आहे, त्यामुळे काय माहित तिचं लग्नाबाबत काय मत आहे. कदाचित ती लग्नच नाही करणार”, असं श्वेता म्हणाली आहे. “एकेरी पालकत्व कठीण नसतं जर तुम्ही कमावत असाल आणि हिंमत असेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे मुलांचं संगोपन करू शकता”, असंही ती म्हणाली आहे.

मुली-मुलांमध्ये भेदभाव

“एखाद्या मुलाचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्याला कुणी काही बोलत नाही पण मुलीचे असतील तर तिच्या विषयी खूप चर्चा होते”, असंही श्वेता म्हणाली.

श्वेता तिवारी हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. तिने 1998मध्ये राजा चौधरीसोबत लग्न केलं आणि 2012 मध्ये दोघे विभक्त झाले. त्यानंतर 2013 मध्ये तिने अभिनव कोहलीसोबत लग्न केलं.

संबंधित बातम्या

विद्यार्थी आंदोलनांमध्ये सतत दिसणारा ‘गोड’ चेहरा, स्वरा भास्करचं जेएनयूशी नातं काय?

Video: अंडरवॉटर फोटोशूट कसं केलं जातं? पहा ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ!

नम्रता मल्लाचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.