Uorfi Javed | उर्फी जावेद हिने अरमान मलिकच्या बाळांना पाठवले खास गिफ्ट, पायल मलिक हिने दिले हे उत्तर
यूट्यूब अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी या नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा लोक यांच्यावर टिका देखील करताना दिसतात. मात्र, यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. नुकताच अरमान मलिक यांच्या मुलांना उर्फी जावेद हिने खास गिफ्ट पाठवले आहे.
मुंबई : यूट्यूब अरमान मलिक (Armaan Malik) काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अरमान मलिकच्या घरी एका महिन्यामध्ये तीन बाळांचे आगमन झाले आहे. अरमान मलिक यांची दुसरी पत्नी कृतिका मलिक हिने 6 एप्रिल रोजी एका मुलीला जन्म दिला याचे नाव जैद ठेवण्यात आले असून अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मलिक (Payal Malik) हिने देखील नुकताच दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. पालक मलिक हिने एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला असून मुलाचे नाव अयान आणि मुलीचे नाव तुबा ठेवण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कृतिका मलिक (Kritika Malik) हिच्या मुलाची म्हणजेच जैदची तब्येत खराब आहे.
नुकताच ब्लाॅगमध्ये पायल मलिक हिने उर्फी जावेद हिचे धन्यवाद मानले आहेत. ब्लाॅगमध्ये दिसत आहे की, मलिक कुटुंबियांच्या घरी एक पार्सल येते. विशेष म्हणजे चक्क यांना हे पार्सल उर्फी जावेद हिने पाठवले आहे. उर्फी जावेद हिने सर्वात अगोदर यांचे अभिनंदन केले असून यांच्या बाळांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
इतकेच नाही तर उर्फी जावेद हिने केक आणि काही चाॅकलेट देखील पाठवले आहेत. पायल उर्फी जावेद हिला तिच्या घरी आमंत्रित करताना देखील दिसत आहे. बऱ्याच दिवसांनंतर उर्फी जावेद हिच्यासोबत बोलणे झाल्याचे देखील पायल सांगताना दिसत आहे. उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते.
उर्फी जावेद हिने हे खास पार्सल पाठवल्याने पायल मलिक ही आनंदी झाल्याचे देखील दिसत आहे. नुकताच इंदूरमध्ये उर्फी जावेद हिच्या विरोधात काही महिला या रस्त्यावर आल्या असून उर्फी जावेद हिच्या कपड्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय. आता या मोर्चाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद हिने तिच्या कपड्यांमुळे नक्कीच एक खास ओळख मिळवली आहे. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केली आहे. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीपासून मिळाली आहे. आपण कधीच बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये दिसणार नसल्याचे म्हणताना उर्फी जावेद ही दिसत होती.