Uorfi Javed | नो एन्ट्री! उर्फी जावेद हिला मुंबईतील या रेस्टॉरंटमध्ये येण्यास बंदी, अभिनेत्रीचा मोठा दावा, चाहत्यांना बसला धक्का
उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. बऱ्याच वेळा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील सापडते. मात्र, याचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.
मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) बघायला मिळते. नेहमीच उर्फी जावेद ही आपल्या चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटोशूट करताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेत शर्ट न घालता एक फोटोशूट (Photoshoot) केले होते. याचा एक व्हिडीओ चक्क उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उर्फी जावेद हिला धारेवर धरत खडेबोल सुनावले होते.
उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे यापूर्वी अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या आहेत. मात्र, धमक्यांचा फार काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर पडत नाही. कायमच उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे.
नुकताच उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये उर्फी जावेद हिने अत्यंत मोठा दावा केलाय. उर्फी जावेद हिची ही पोस्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. कपड्यांमुळे आपल्याला एका मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश न दिल्याच्या दावा उर्फी जावेद हिने केला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उर्फी जावेद हिने लिहिले की, तुम्हाला मी आवडत नसेल तर माझ्याकडे दुर्लक्ष करा. परंतू तुम्ही मला इग्नोर अजिबात करू शकत नाहीत. 21 व्या सदीमध्ये माझ्या कपड्यांमुळे मला रेस्टॉरंटमध्ये बंदी आहे. यावर माझा विश्वासच नाहीये. खरोखरच मी मुंबईत आहे का? हाच प्रश्न मला पडलाय.
जर तुम्हाला माझी फॅशन आवडत नसेल तर ठिक आहे…पण माझ्यासोबत अशाप्रकारचा व्यवहार करणे खूप जास्त चुकीचे आहे. जर तुम्ही या गोष्टी करत आहेत तर याचा स्वीकार देखील करा. उगाच खोटे कारणे सांगत बसू नका. विशेष म्हणजे ही स्टोरी उर्फी जावेद हिने थेट Zomato ला टॅग केलीये. आता यावर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी यावर उर्फी जावेद हिला सपोर्ट करण्यास सुरूवात केलीये तर काहींनी रेस्टॉरंटने योग्य निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.