आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्यावर उर्फी जावेद हिच्याकडून टीका; कारण LGBTQ समुदाय

तोकड्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असेलेली उर्फी जावेत पुन्हा चर्चेत, LGBTQ समुदायाची बाजू मांडत मॉडेलकडून आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्यावर टीका

आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्यावर उर्फी जावेद हिच्याकडून टीका; कारण LGBTQ समुदाय
आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्यावर उर्फी जावेद हिच्याकडून टीका; कारण LGBTQ समुदाय
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 9:22 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मॉडेल उर्फी जावेद तिच्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. तोकडे कपडे घालून सोशल मीडियावर सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी हिला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोध केला. शिवाय चित्रा वाघ यांनी उर्फीच्या अटकेची देखील मागणी केली आहे. सध्या दोघींमधील वादामुळे वातावरण तापलं असताना आणखी एका मुद्द्यामुळे उर्फी चर्चेत आली आहे. आता उर्फीने थेट आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्यावर टीका केली आहे.

आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्यावर यांच्या एका पोस्टवर उर्फीने निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये LGBTQ समुदायाबद्दल आणि त्यांच्याकडून होणाऱ्या कॅम्पेनबद्दल सद्गुरु यांनी स्वतःचं मत मांडलं आहे. सध्या सर्वत्र या प्रकरणाची चर्चा आहे. शिवाय उर्फीची पोस्ट देखील सर्वत्र व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये सद्गुरु म्हणाले, ‘काही लोक या समुदायाचं सर्मर्थन करत आहेत, तर काही मात्र विरोध करत आहेत. सध्या सुरु असण्याऱ्या मोहिमेमुळे समुदायाची संख्या वाढत आहे. पूर्वी ही संख्या कमी प्रमाणात होती. म्हणून ही मोहिम कुठेतरी थांबायला हवी. निसर्गाने ज्याप्रकारे तुम्हाला जन्म दिला आहे, तो स्वीकारता यायला हवा. जर कोणी वेगळ्या मार्गाने जात असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.’ असं मत सद्गुरु यांनी व्यक्त केलं.

आध्यात्मिक गुरु सद्गुरु यांच्या पोस्टवर उर्फीने विरोध केला आहे. उर्फी म्हणाली, ‘जे कोणी सद्गुरु यांना फॉलो करत असेल, त्यांनी मला अनफॉलो करा. या मोहिमेत असणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने मत मांडू शकतो. LGBTQ समुदायाची संख्या बिलकूल लहान नाही. यांचे विचार संकुचित आहेत.’

उर्फी पुढे म्हणाली, ‘ LGBTQ समुदायाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या लैंगिकतेबद्दल कुठेच वाच्यता केली नाही. पण आज या समुदायातील लोक पुढे येवून स्वतःचं अस्तित्त्व स्वीकारत आहेत. त्यामुळे त्यांना या मोहिमीची अत्यंत गरज आहे.’ असं देखील उर्फी म्हणाली.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.