‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून परीने का घेतला ब्रेक? अखेर कारण आलं समोर

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झालेली आहे. मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे चिमुरडी बाल कलाकार मायरा वायकुळ.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून परीने का घेतला ब्रेक? अखेर कारण आलं समोर
Prarthana Behere and Myra VaikulImage Credit source: Instagram/ Prarthana Behere
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 11:03 AM

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झालेली आहे. या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे हा दिसत आहे. श्रेयस तळपदे या मालिकेमध्ये यशची भूमिका अत्यंत चोख साकारतोय. तसंच या मालिकेमध्ये त्याच्यासोबत प्रार्थना बेहेरे नेहा कामत ही भूमिका साकारताना दिसतेय. मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे चिमुरडी बाल कलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul). मायरा या मालिकेत परीची (Pari) भूमिका साकारत आहे. चिमुकल्या मायराचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेकजण फक्त मायरासाठी ही मालिका पाहतात, अशीही सोशल मीडियावर चर्चा असते. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मात्र याच वेळी परीने मालिकेतून ब्रेक घेतल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून परी मालिकेत न दिसल्याने प्रेक्षक तिला मिस करत आहेत. मायराने या मालिकेतून ब्रेक का घेतला, याचं कारण समोर आलं आहे.

चिमुकली परी काही दिवसांपूर्वी कोकणात फिरायला गेली होती. या भटकंतीचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केले जात होते. त्यानंतर आता तिच्या मामाच्या लग्नासाठी ती नाशिकला पोहोचली आहे. नुकताच मायराच्या मामाच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मायरानेही खूप धमाल केली. त्याचेही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यावेळी मायराने पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मामाच्या लग्नसोहळ्यातील काही क्षण मायराच्या युट्यूब चॅनलवरही पोस्ट करण्यात आले आहेत. मुंबई ते नाशिकचा प्रवास आणि त्यानंतर लग्नाची खरेदी तिने कशी केली, हे या व्हिडीओत पहायला मिळत आहे.

मायरा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटोज आणि व्हिडीओज चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. मायरा‌ला ज्या वेळी शूट करायचा असतो, त्यावेळेस ती अनेकांची मदत घेते. सुरुवातीला मालिकेचे दिग्दर्शक मायरा हिला तीचा सीन काय आहे, ते समजून सांगतात. त्यानंतर तिला प्रार्थना आणि श्रेयस हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात. त्यानंतर ती आपल्याला काय डायलॉग म्हणायचे आहेत, ते पाठ करते. तिच्या निरागस अभिनयाने तिने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

हेही वाचा:

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो’; किशोर कदम म्हणतात..

राज ठाकरेंच्या आवाजात महागर्जना; ‘हर हर महादेव’चा टीझर पहायलाच हवा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.