मांडव सजलाय अंगणदारी, नटून थटून तयार नवरदेवाची स्वारी, स्वीटूच्या ओमच्या वेडिंग लूक पाहिलात का?

झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला...’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे.

मांडव सजलाय अंगणदारी, नटून थटून तयार नवरदेवाची स्वारी, स्वीटूच्या ओमच्या वेडिंग लूक पाहिलात का?
ओम
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 11:50 AM

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला…’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिका शेवटच्या टप्प्याकडे सरकत असल्याने, मालिकेच्या कथानकाने जोरदार वेग पकडला आहे. आता स्वीटूची आई अर्थात नलू मावशी हिचा स्वीटू आणि ओमच्या नात्याला असलेला विरोध पूर्णपणे मावळला आहे.

ओमने आपल्या मुलीच्या आयुष्यात येऊ नये, यासाठी नलूने त्याला अनेक कष्ट करायला लावले. मात्र, कुठल्या परीक्षेला न घाबरता आपल्या प्रेमावर विश्वास ठेऊन ओम नेहमीच जिंकत राहिला. अर्थात त्याच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे नलूचा विरोध आता होकारात बदलला आहे. तिने या दोघांच्या नात्याला अखेर परवानगी दिली आहे. आता लवकरच या मालिकेत स्वीटू आणि ओमच्या लग्नाची धामधूम दिसणार आहे. या विशेष भागाचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. यावेळी ओमचा लग्नातील लूक समोर आला आहे.

पाहा ओमचा वेडिंग लूक…

मरून रंगाचा शेरवानी फेटा आणि शेला असा ओमचा लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शाल्व किंजवडेकरच्या या लूकला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत स्वीटू आणि ओमच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. या खास सोहळ्यात लग्नाचे सगळे विधी दाखवले जाणार आहेत. मेहंदी, संगीत, हळद असे सगळेच लग्नविधी खूप रंगणार आहेत.

काय होती ‘या’ मालिकेची कथा?

आपलं सुखाचं हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असे घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची तिला कायमच उणीव भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी ही मालिका आहे. अद्याप लग्नाचा ट्रॅक आला नसला तरी शकु आणि स्वीटूची नात्यानं या दोघी सासू सून आहेत. पण मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत.मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत करतात. आणि या गंमतीचच नाव आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’.

अभिनेत्री शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर, शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत.

हेही वाचा :

तो बाहुला अन् ती बाहुली, जुळतील का दोघांच्या रेशीमगाठी? पाहा नव्या मालिकेचं नवं शीर्षक गीत

18 व्या वर्षी लग्न, 25 व्या वर्षी पदरी तीन मुलं, घटस्फोटानंतर सिंगल मदर बनून मुलांचा सांभाळ करतेय कनिका कपूर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.