Aggbai Sunbai | सोहमचं वागणं बेछूट तरीही आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी?

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अग्गबाई सूनबाई' मध्ये (Aggbai Sunbai) आता एक विलक्षण वळण आलं आहे. सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरीने त्या दोघांनाही घराबाहेर काढलं आहे. इतकंच नव्हे तर, आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील काढून टाकले आहे.

Aggbai Sunbai | सोहमचं वागणं बेछूट तरीही आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी?
आसावरी
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 2:01 PM

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अग्गबाई सूनबाई’ मध्ये (Aggbai Sunbai) आता एक विलक्षण वळण आलं आहे. सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरीने त्या दोघांनाही घराबाहेर काढलं आहे. इतकंच नव्हे तर, आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील काढून टाकले आहे. इतकं होऊन सुद्धा सोहमला स्वतःची चूक कळत नाही आहे. आपल्या मुलाच्या बेछूट वागण्याला लगाम लावण्यासाठी आसवारीने कठोर पावलं उचलली आहे (Zee Marathi Serial Aggbai Sunbai Latest episode update soham takes grandfathers help to enter in house).

मात्र, आसवारीच्या या कठोर निर्णयांना आव्हान देत सोहमने पुन्हा एकदा आपले प्रताप दाखवण्यास सुरुवात केली आहे. आसावरी घराबाहेर काढलेला सोहम चिडल्यामुळे क=तिच्या विरुद्ध नवी कटकारस्थान रचत आहे.

काय असणार सोहमचा नवा डाव?

सोहम सुझेनच्या घरी राहायला गेल्यावर तिच्या घराची अवस्था बघून परत आपल्या घरी जायला पाहिजे असं ठरवतो. पण आसावरी त्याला घरात घेणं शक्य नाही म्हणून सोहम आता आजोबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून डाव साधणार आहे. आजोबा घरी येतात सोहम बद्दल विचारतात.

घरातले सगळे खोट कारण देतात की, तो कामासाठी बाहेर गेला आहे. पण सोहमला आसावरीने घराबाहेर काढल्याचे आजोबांना बबडूकडून कळतं आणि आजोबांना चक्कर येते. आजोबा आसावरीकडे सोहमला परत घरी आणायचा हट्ट करतात. त्याचवेळी सोहम देखील या प्रकरणात आजोबांचे कान भरण्याचे काम करणार आहे.

काय असेल आसवारीचा निर्णय?

सोहमने शुभ्राची फसवणूक केल्यामुळे आसवारीने लेकाला धडा शिकवून, सुनेला न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. पण शुभ्राला न्याय मिळवून देण्यासाठी आसावरीने हे उचललेलं हे पाऊल तिला आजोबांमुळे मागे घ्यावे लागेल का?  आजोबांच्या हट्टापायी आसावरी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

नवा ‘बबड्या’ नवे कारनामे?

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत अभिनेता आशुतोष पत्की ‘बबड्या’ अर्थात ‘सोहम कुलकर्णी’ हे पात्र सकारात होता. मात्र, आताच्या मालिकेत म्हणजे ‘अग्गबाई सासूबाई’च्या सिक्वेलमध्ये ‘सौमित्र’ म्हणून गाजलेला अभिनेता अद्वैत दादरकर हा ‘सोहम कुलकर्णी’ साकारत आहे. अद्वैत साकारत असलेला ‘सोहम’ हा जुन्या ‘सोहम’ प्रमाणे तिरसट आणि हेकेखोर आहे. पण, तो घाबरट मुळीच नाही. बेधडकपाने चुकीची कामे करणारी व्यक्तीरेखा असून, यात काहीशी नकारात्मक छटा देखील आहे. ‘शुभ्रा’, ‘अभिजित राजे’, ‘आसावरी’, ‘आजोबा’ आणि चिमुकला ‘बबडू’ असं सुखी कुटुंब असतानाही तो सुझेन नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे.

या मुलीला त्याने आपली सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवून घेतले आहे. इतकेच नाही तर, एरव्ही आई आणि बायकोसमोर, शांत आणि सुस्वभावी दिसणारा हा सोहम त्यांची पाठ फिरताच एका नव्या अवतारात प्रकट होतो. या अवतारातच तो सगळी गैरकृत्य करतो. बायकोने घरात राहावं, अशी अपेक्षा बाळगणारा हा नवरा मात्र स्वतः स्वैराचार करत आहे.

(Zee Marathi Serial Aggbai Sunbai Latest episode update Soham takes grandfathers help to enter in house)

हेही वाचा :

प्रख्यात अभिनेत्री Mandira Bedi चे पती राज कौशल यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास

Devmanus | ‘देवमाणसा’चा पर्दाफाश होणार? एसीपी दिव्या सिंहसह आर्या कोर्टात सादर करणार ‘हा’ महत्त्वाचा पुरावा!

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.