Sharwanand | लग्नाच्या काही दिवस आधीच प्रसिद्ध अभिनेत्याचा कार अपघात; हेल्थ अपडेट आली समोर

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी शारवानंदच्या कारचा अपघात झाला. अपघाताच्यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये इतरही काही जण होते. हैदराबादमध्ये फिल्म नगर जंक्शन या ठिकाणी हा अपघात झाला.

Sharwanand | लग्नाच्या काही दिवस आधीच प्रसिद्ध अभिनेत्याचा कार अपघात; हेल्थ अपडेट आली समोर
Telugu actor SharwanandImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 2:29 PM

हैदराबाद : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता शारवानंदचा रविवारी कार अपघात झाला. अवघ्या काही दिवसांतच तो लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या काही दिवस आधीच त्याचा अपघात झाला असून त्याची प्रकृती आता ठीक आहे. शारवानंदने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. मेगास्टार चिरंजीव यांच्यासोबत ‘थम्स अप’ या ब्रँडची जाहिरात केल्यामुळे शारवानंद प्रकाशझोतात आला होता. आपल्या करिअरमध्ये त्याने चिरंजीवी, व्यंकटेश यांसारख्या दिग्गज तेलुगू अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

‘आज सकाळी माझ्या कारचा अपघात झाल्याचं वृत्त आहे. पण हा अपघात किरकोळ होता. तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी सुखरुप आणि सुरक्षित आहे. माझी काळजी करू नका. तुम्हा सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीसाठी मी तुमचा आभारी आहे’, असं त्याने ट्विट करत स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

शारवानंदच्या या ट्विटवर कमेंट करत अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात शारवानंदचं लग्न होणार आहे. रक्षिता रेड्डीसोबत तो लग्नगाठ बांधणार आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. शारवानंद आणि रक्षिताच्या साखरपुड्याला मेगास्टार चिरंजीवी आणि नागार्जुन यांचं कुटुंब, राणा डग्गुबत्ती, सिद्धार्थ, अदिती राव हैदरी, नितीन, श्रीकांत हे दाक्षिणात्य सेलिब्रिटी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी शारवानंदच्या कारचा अपघात झाला. अपघाताच्यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये इतरही काही जण होते. हैदराबादमध्ये फिल्म नगर जंक्शन या ठिकाणी हा अपघात झाला. कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असला तरी सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती अभिनेत्याच्या टीमने दिली. मात्र या अपघातात कारचं थोडं नुकसान झालं.

शारवानंदने 2004 मध्ये ‘एधो तारिखू’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्याने प्रस्थानम, रन राजा रन, मल्ली मल्ली इदी रानी रोजू, एक्स्प्रेस राजा, महानुभवुडू यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रामचरण आणि राणा डग्गुबत्ती हे त्याचे क्लासमेट्स होते. गेल्या वर्षी त्याचे ‘आडवाल्लू मीकू जोहरालू’ आणि ‘ओके ओका जिवीतम’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.