Gayathri Accident: मैत्रिणींसोबतची होळी ठरली शेवटची; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अवघ्या 26 वर्षी अपघातात मृत्यू

हैदराबादमधील गचिबोली या परिसरात हा अपघात झाला. अवघ्या 26 वर्षांची गायत्री ही इंटरनेट सेन्सेशन होती. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 18 मार्च रोजी होळी सेलिब्रेशननंतर मित्रासोबत घरी परतत असताना तिच्या गाडीचा अपघात झाला.

Gayathri Accident: मैत्रिणींसोबतची होळी ठरली शेवटची; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अवघ्या 26 वर्षी अपघातात मृत्यू
Telugu actress GayathriImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 12:38 PM

प्रसिद्ध तेलुगू अभिनेत्री (Telugu actress) गायत्री (Gayathri) उर्फ डॉली डी क्रूझचं (Dolly D Cruze) अपघातात निधन झालं. हैदराबादमधील गचिबोली या परिसरात हा अपघात झाला. अवघ्या 26 वर्षांची गायत्री ही इंटरनेट सेन्सेशन होती. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 18 मार्च रोजी होळी सेलिब्रेशननंतर मित्रासोबत घरी परतत असताना तिच्या गाडीचा अपघात झाला. गायत्रीचा मित्र राठोड हा गाडी चालवत होता. राठोडचं कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजकाला ती धडकली आणि उलटली. यावेळी गायत्रीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राठोडला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. या भीषण अपघातात एका पादचारी महिलेचाही मृत्यू झाला. ज्या वेळी गायत्रीची कार उलटली त्यावेळी 38 वर्षीय महिला त्याखाली चिरडली गेली आणि घटनास्थळीच तिने अखेरचा श्वास घेतला. गायत्रीच्या निधनाने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

सोशल मीडियावर गायत्री तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत राहिली. तेलुगू इंडस्ट्रीतील कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे गायत्रीला श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री सुरेखा वाणीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या. ‘मला अजूनही विश्वास बसत नाही. गायत्री, तू परत ये, आपल्याला एकत्र बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. ही तुझी जाण्याची वेळ योग्य नव्हती’, अशी पोस्ट तिने लिहिली.

गायत्रीची इन्स्टा पोस्ट- 

कोण होती गायत्री?

गायत्री उर्फ डॉली डी क्रूझ ही मूळची तेलंगणातील नारायणपेट जिल्ह्यातील लंकाला गावची होती. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या डॉलीने ‘जलसा रायडू’ नावाच्या तिच्या यूट्यूब चॅनेलद्वारे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. युट्यूब व्हिडीओजवरून गायत्रीला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीमुळे तिला तेलुगू वेब सीरिजमध्ये भूमिकेची ऑफर मिळाली. ‘मॅडम सर मॅडम अंटे’ या वेब सीरिजमध्ये तिने भूमिका साकारली. काही शॉर्ट फिल्म्समध्येही तिने काम केलं.

हेही वाचा:

The Kashmir Filesची कथा काल्पनिक असल्याचा आरोप करणाऱ्यांवर पल्लवी जोशी भडकल्या; म्हणाल्या..

Lock Upp: विवाहित असताना दुसऱ्या पुरुषाला केलं होतं किस; निशा रावलचा खुलासा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.