Video : ऋतिक रोशन याची गर्लफ्रेंड भडकली, थेट सुनावले खडेबोल, सबा आझाद हिने थेट चाहत्याला
ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. नेहमीच ऋतिक रोशन हा सबा आझाद (Saba Azad) हिच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. इतकेच नाही तर मध्यंतरी एक चर्चा होती की, ऋतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत लवकरच साखरपुडा करणार आहे. मात्र, ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांनी त्यांच्या साखरपुड्याबद्दल काहीच खुलासा केला नाही.
ऋतिक रोशन याच्या वाढदिवसाच्या दिवशी अत्यंत खास फोटो शेअर करताना सबा आझाद दिसली. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी थेट विदेशात पोहचले. यावेळी ऋतिक रोशन याने सबा आझाद हिच्यासोबतचे काही अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. अनेकांना ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अजिबातच आवडत नाही.
ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या फोटोवर कमेंट करत अनेकजण थेट म्हणतात की, मुलगी आणि वडिलांची सुंदर जोडी. सध्या सबा आझाद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सबा आझाद ही चांगलीच भडकल्याचे दिसतंय. सबा आझाद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाले.
View this post on Instagram
सबा आझाद ही जीममधून बाहेर येत असताना काही पापाराझी हे तिचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यासाठी तिच्याजवळ जातात. यावेळी थेट सबा आझाद ही म्हणाली की, माझे फोटो घेऊन काय करणार आहात तुम्ही? तुम्हाला काय हवे आहे. मी किती वेळ झाले चालत आहे आणि तुम्ही लोक माझ्यासोबत येत आहात, नका करू हे सर्व.
इतकेच नाही तर यावेळी एक चाहता फोटो घेण्यासाठी सबा आझाद हिच्याजवळ येतो. मात्र, या चाहत्यांला देखील फोटो सबा आझाद ही काढू देत नाही. आता हाच सबा आझाद हिचा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, हिच्या मागे इतके लागण्याची काय गरज आहे? हिने कोणत्या चित्रपटात काम केले.