बी-ग्रेड चित्रपटामुळे संपलं अभिनेत्रीचं करिअर; ना कमावला पैसा, ना झालं लग्न; आता इतका बदलला लूक

अनेकदा करिअरमधील चित्रपटांची निवड हे कलाकारांचं भवितव्य ठरवतं. ही निवड चुकली की यशाच्या मार्गात अनेक अडथळे येतात. त्यातून काहींना सावरता येतं. तर काहींचं संपूर्ण करिअरच संपुष्टात येतं. आशा यांच्यासोबतही हेच घडलं.

बी-ग्रेड चित्रपटामुळे संपलं अभिनेत्रीचं करिअर; ना कमावला पैसा, ना झालं लग्न; आता इतका बदलला लूक
Asha SachdevImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 12:21 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार होऊन गेले, ज्यांना सुरुवातीला प्रचंड यश मिळालं. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा निवडीमुळे त्यांचं पुढील करिअर उद्ध्वस्त झालं. अभिनेत्री आशा सचदेव यांच्यासोबत असंच काहीसं घडलं. गेल्या बऱ्याच वर्षांपासून त्या लाइमलाइटपासून दूर आहेत. मात्र एकेकाळी त्या इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मानल्या जायच्या. 70 च्या दशकात आशा यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्याकाळी त्यांनी लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत काम केलं होतं. मात्र एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला.

अनेकदा करिअरमधील चित्रपटांची निवड हे कलाकारांचं भवितव्य ठरवतं. ही निवड चुकली की यशाच्या मार्गात अनेक अडथळे येतात. त्यातून काहींना सावरता येतं. तर काहींचं संपूर्ण करिअरच संपुष्टात येतं. आशा यांच्यासोबतही हेच घडलं. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर सर्वकाही बदललं. आशा यांनी इंडस्ट्रीत जवळपास तीन दशकं म्हणजेच 30 वर्षे काम केलं. चित्रपटांशिवाय त्यांनी बऱ्याच टीव्ही मालिकांमध्येही काम केलं.

जेव्हा आशा त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांनी एक बी-ग्रेड चित्रपट साइन केला. त्यानंतर त्यांना चांगलं काम मिळालंच नाही. ‘बिंदिया और बंदूक’ असं या चित्रपटाचं नाव होतं. जेव्हा आशा यांनी बी-ग्रेड चित्रपट केला, तेव्हा इंडस्ट्रीतील अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून चार हात लांब राहणंच पसंत केलं. त्यामुळे बरेच मोठे प्रोजेक्ट्स त्यांच्या हातून निसटले. अखेर त्यांना कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत समाधान मानावं लागलं. अखेर त्यांच्यावर अशी वेळ आली, जेव्हा त्यांना इंडस्ट्रीला रामराम करावा लागला.

हे सुद्धा वाचा

आशा सचदेव यांनी ‘द बर्निंग ट्रेन’, ‘वो मैं नहीं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यामध्ये त्यांनी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता. याशिवाय आशा यांनी इतरही मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.