सलमानने घातलेलं हिरेजडित घड्याळ जगात फक्त 18 लोकांकडेच ;किंमत वाचून धक्का बसेल
सलमान खानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानने हातात घातलेल्या डायमंड घडाळ्याची चर्चा होताना दिसत आहे. हे घड्याळ इतकं महाग आहे की किंमत वाचून धक्का बसेल.
बॉलिवूडचा दबंग सलमान खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच 27 डिसेंबरला बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने त्याचा 59 वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षीप्रमाणे सलमान खानसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची हजेरी होती.
सलमानच्या हातात हिरेजडित घड्याळ
सलमानसाठी अनंत अंबानीने पार्टी होस्ट केली होती. गुजरातमधील जामनगर येथे ही खास पार्टी ठेवण्यात आली होती. यादरम्यान सलमानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये सलमानने हातात घातलेल्या हिऱ्यांच्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधल आहे. हेच हिऱ्यांचे घड्याळ अनंत अंबानींच्या लग्नावेळीदेखील सलमान खानने घातले होते.
जेकब अरबो यांनी सलमानला दिले हिरेजडीत घडाळ
सलमान खानने घातलेल्या हिरेजडित लग्झरी घड्याळाची किंमत वाचून धक्का बसेल. हे घड्याळ एका खास व्यक्तीने सलमान खानला गिफ्ट म्हणून दिलं होतं. सलमान खानने काही महिन्यांआधी अमेरिकन लक्झरी घड्याळ आणि ज्वेलरी ब्रँड जेकर अँड कंपनीचे मालक जेकब अरबो यांची भेट घेतली होती. जेकबने सलमान खानला त्यांची ‘बिलेनियर III’ नावाचे लक्झरी घड्याळ गिफ्ट म्हणून दिले होते.
जेकब अरबो यांनी शेअर केला होता व्हिडिओ
जेबक यांनी इंस्टावर हा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये जेकब सलमान खानला स्वत:च्या हाताने हातात घड्याळ घालताना दिसत आहे आणि सलमानसोबत गळाभेट करतानाही दिसत आहे.
View this post on Instagram
तसेच हा व्हिडीओ शेअर करत ‘मी कधीच कोणाला ‘बिलियनेअर’ घालू देत नाही, पण सलमान इतरांपेक्षा वेगळा आहे.’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
घडाळ्याची किंमत जाणून डोकं चक्रावेल
दरम्यान या घड्याळावर 714 पांढरे हिरे लावलेले आहेत. सलमान खानने जे “jacobarabo” कंपनीचे हिऱ्यांचे घड्याळ हातात घातले आहे ते घड्याळ जगातील फक्त 18 लोकांकडेच आहे. या घडाळ्याच्या किंमतीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. या घड्याळाची किंमत 7.7 मिलियन म्हणजेच 65 कोटी रुपये आहे. एवढ्या महागड्या घड्याळाचा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या सेलेब्सकडे आहे हे लक्झरी घड्याळ
क्रिस्टियानो रोनाल्डोसह अनेक सेलिब्रिटी जेकब अरबो बिलियनेअर III घालतात. या घडाळ्यवर 152 पांढरे कट हिरे आणि 76 हिरे जडलेले आहेत. या घड्याळाच्या ब्रेसलेटमध्ये 504 पांढरे कट हिरे आहेत. दरम्यान मॅडोना, रिहाना आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारखे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी जेकब अरबोचे घड्याळ आणि दागिने घालतात.