Mouni Roy | दिग्दर्शकाचे मौनी रॉय हिच्यावर गंभीर आरोप, थेट केली भांडाफोड, मोठी खळबळ
मौनी रॉय हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला. मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केली. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुंबई : मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. मौनी रॉय (Mouni Roy) ही एकता कपूर हिच्या नागिन मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली. विशेष म्हणजे मौनी रॉय हिच्या करिअरमधील ती पहिलीच मालिका. मौनी रॉय हिला खरी ओळख ही नागिन मालिकेतूनच मिळाली. विशेष म्हणजे मौनी रॉय करत असलेले सीजन (Season) हिट ठरले. तेंव्हापासून मग मौनी रॉय हिने आयुष्यामध्ये कधीच मागे वळून बघितले नाही. मौनी रॉय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
फक्त अभिनयच नाही तर मौनी रॉय ही एक व्यवसायिक देखील आहे. मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये मौनी रॉय हिचे स्वत:च्या मालिकेचे हाॅटेल आहेत. हाॅटेलच्या माध्यमातूनही मौनी रॉय ही तगडी कमाई महिन्याला करते. मौनी रॉय ही कोट्यावधी संपत्तीची आज मालकीन आहे. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते.
काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय हिने सुंदर असे फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले. नुकताच डर्टी पिक्चर, वंस अपॉन ए टाइम इन मुंबई, कच्चे धागे अशा चित्रपटांना निर्देशित केलेले मिलन लूथरिया यांनी मौनी रॉय हिच्यासह ताहिर याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर भर ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात मौनी रॉय हिची भांडाफोड केली.
मिलन लूथरिया याचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. मिलन लूथरियाने काही धक्कादायक खुलासे देखील यावेळी केले. कलाकारांनी आपल्याला कशाप्रकारे त्रास दिला हे सांगताना मिलन लूथरिया हे दिसले. सुलतान ऑफ दिल्लीचे निर्देशक मिलन लूथरिया म्हणाले की, पुढच्या वेळी वेब सीरिज ज्यावेळी तयार करणार त्यावेळी मी हे अनुभव लक्षात ठेवणार.
मिलन लूथरिया म्हणाले की, मला कलाकारांनी खूप जास्त त्रास दिलाय. मला वाटले की, यांच्यासोबत काम करताना मजा येईल मात्र, ती सजा झाली. मिलन लूथरिया म्हणाले, मौनी रॉय ही सेटवर तब्बल तीन तास उशीरा येत. ताहिर राज साडेतीन तास उशीर येत. अंजुम शर्मा हिला तिच्या मनावरची पांढरीच व्हॅनिटी व्हॅन लागते. हरलीन सेठी तिच्या डायलॉगपेक्षा चार गोष्टी जास्तच बोलायची. यानंतर मी जेंव्हा केंव्हा ओटीटीसाठी सीरिज तयार करेल त्यावेळी मी हे सर्व लक्षात ठेवणार.