The Family Man 2 Full Review: श्रीकांत तिवारीवर भारी राजी, सामंथानं अख्खी सीरीज खाऊन टाकली, वाचा सर्वात आधी रिव्ह्यू

पहिला सिझन उत्तर भारतात घडतो तर दुसरा सिझन हा दक्षिण भारतात घडतोय. पहिल्या सिझनमधले बहुतांश कॅरेक्टर हे दुसऱ्या सिझनमध्येही आहेत. त्यातली गुंतागुत कायम आहे. (The Family Man 2 Complete Review)

The Family Man 2 Full Review: श्रीकांत तिवारीवर भारी राजी, सामंथानं अख्खी सीरीज खाऊन टाकली, वाचा सर्वात आधी रिव्ह्यू
The Family Man 2
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 8:45 AM

The Family Man 2 Complete Review : पहिल्या सिझनपेक्षा हा दुसरा सिझन आणखी मोठ्या प्रमाणात बनवला गेला आहे. 9 भागात सिरिज विस्तारली गेली आहे. ज्या एका वेबसिरीजची तमाम प्रेक्षकांना प्रतिक्षा होती तो द फॅमिली मॅन 2 (The Family Man 2) निर्धारीत वेळेपेक्षा आधीच रिलिज झाला आणि प्रेक्षकांनी रात्रभर जागून तो पाहिलाही. बहुतांश भारतीय वेबसिरीजचे दुसरे सिझन फसलेत. प्रेक्षकांना ते आवडलेले नाहीत. पण द फॅमिली मॅन 2 त्याला अपवाद आहे. कारण बहुतांश प्रेक्षक मनोज वाजपेयीने साकारलेल्या (Manoj Bajpai) श्रीकांत तिवारीच्या कामगिरीवर खुश आहेत. विशेष म्हणजे साऊथ स्टार सामंथा अक्निनीचा (Samantha Akkineni) पॉवरफुल परफॉर्मन्स बघून चकित होतील. (The Family Man 2 Amazon Prime Web Series starring Samantha Akkineni Manoj Bajpai Complete Review)

काय आहे स्टोरी?

द फॅमिली मॅन 2 ही श्रीकांत तिवारी ह्या इंटेलिजन्स ऑफिसरच्या आयुष्याभोवती फिरत राहते. नव्या सिझनमध्ये तो नव्या नोकरीला लागलेला आहे. ‘टास्क’ची नोकरी सोडून त्यानं आता एका कार्पोरेट कंपनीत जॉब सुरु केला आहे. Don’t be a minimum guy चा त्याला तिथेही उबग आला आहे. शेवटी तो पुन्हा ‘टास्क’ ज्वाईन करतो आणि सुरु होता पुन्हा एकदा मांजर आणि उंदराचा खेळ. नव्या सिझनमध्ये एलटीटीईशी संबंधीत कथानक आहे. श्रीलंकन तमिळ बंडखोर आणि त्यांना ISI ची फूस या पार्श्वभूमीवर कथानक उलगडत जातं. लहान मोठ्या घटनांमधून ते इंट्रेस्टिंग होत जातं. चेन्नई, मुंबई, उत्तर श्रीलंका, लंडन अशा वेगवेगळ्या शहरातून गोष्ट फिरत रहाते. तमिळ बंडखोर आणि आयएसआयचे एजंट एका भारतविरोधी मोठ्या मिशनवर आहेत, ते मिशन मोडून काढण्यासाठी श्रीकांत तिवारी, जेके पुन्हा एकदा मैदानात आहेत. सोबतच श्रीकांतच्या वैयक्तिक आयुष्याचे वाजलेले बाराही सिरीजमध्ये समांतर घडत रहातात.

पहिल्या सिझनशी कनेक्ट आहे?

दिल्लीतल्या केमिकल फॅक्टरीत स्फोट घडवून आणून संपूर्ण शहर बेचिराख करण्यासाठी अतिरेकी प्रयत्नशील आहेत. त्यात ते यशस्वी होतात की नाही अशा एका प्रचंड उत्सुकता ताणणाऱ्या पॉईंटर येऊन पहिला सिझन संपला होता. दुसऱ्या सिझनमध्ये त्याचं उत्तर मिळतं का तर हो. पण त्यासाठी तुम्ही दुसरा सिझन पहाणं महत्वाचं आहे. पहिला सिझन उत्तर भारतात घडतो तर दुसरा सिझन हा दक्षिण भारतात घडतोय. पहिल्या सिझनमधले बहुतांश कॅरेक्टर हे दुसऱ्या सिझनमध्येही आहेत. त्यातली गुंतागुत कायम आहे.

मनोज वाजपेयी की सामंथा?

दुसऱ्या सिझनमध्ये जेवढी श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयीबद्दल उत्सुकता आहेत तेवढीच साऊथ स्टार सामंथाबद्दलही आहे. ती पहिल्या सिझनमध्ये नव्हती. दुसऱ्या सिझनमध्ये मात्र तिची दमदार भूमिका आहे. तमिळ बंडखोराच्या भूमिकेत सामंथानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या सिझनमध्ये मनोज वाजपेयीनं साकारलेल्या श्रीकांत तिवारीपेक्षा सामंथा अक्निेनीनं साकारलेली राजी अधिक भारदस्त आहे. श्रीकांत तिवारीच्या आयुष्यापेक्षा आपण सिरीज पहाताना राजीच्या आयुष्यात जास्त गुंतत जातोत. कारण त्या आयुष्याला डार्क शेड जास्त आहेत. त्यातच सामंथानं ती इतकी मजबुतपणे साकारलीय की, अख्खा सिझन तिनं खाऊन टाकला आहे. ज्या ज्या वेळेस सामंथा स्क्रिनवर येते त्या त्या वेळेस आपली नजर स्क्रिनवरुन हटत नाही. (The Family Man 2 Complete Review)

पहिला सिझन भारी की दुसरा?

ज्यांनी पहिला सिझन पाहिलेलाच नाही त्यांना दुसरा सिझन भारी वाटण्याची शक्यता आहे. पण ज्यांनी दोन्ही सिझन पाहिलेत, त्यांना पहिला सिझनच मनोरंजक वाटू शकतो. पहिल्या सिझनमध्ये गोष्टीत जे बारीक धागे दोरे आहेत, ते दुसऱ्या सिझनमधल्या गोष्टीत कमी पडल्याचं दिसतं. त्यातच एलटीटीईची पार्श्वभूमी असलेलं कथानक असल्यामुळे काही गोष्टी प्रेडिक्टेबल वाटतात. तिथेच कथानक कमकुवत होतं. काही ठिकाणी तो स्लो वाटतो. पण ओव्हरऑल हा सिझनही तुम्हाला आवडू शकतो. तो खेळवून ठेवतो यात वाद नाही. कुठल्या एका कारणासाठी फॅमिलीन मॅन 2 बघावं असं विचारलात तर त्याचं उत्तर आहे, सामंथानं साकारलेल्या राजीसाठी.

हेही वाचा :

Controversy | ‘The Family Man 2’च्या वादावर मनोज बाजपेयीचं जाहीर निवेदन, सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाले…

(The Family Man 2 Amazon Prime Web Series starring Samantha Akkineni Manoj Bajpai Complete Review)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.