Karnan | ‘कर्णन’चा फर्स्ट लूक आला; धनुषकडून चित्रपटाची तारीख जाहीर!

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा (Dhanush) 'कर्णन' (Karnan) चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Karnan | 'कर्णन'चा फर्स्ट लूक आला; धनुषकडून चित्रपटाची तारीख जाहीर!
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 4:12 PM

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा (Dhanush) ‘कर्णन’ (Karnan) चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. आता याच चित्रपटाविषयी एक मोठी बातमी पुढे आली आहे. नुकताच धनुषने या चित्रपटाच्या रिलीज तारखेची घोषणा केली असून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर धनुषने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. (The first look and date of Karnan movie Dhanush shared on social media)

धनुषने ट्विट करत चित्रपटातील फर्स्ट लूक आणि चित्रपटाची तारीख जाहिर केली आहे. हा चित्रपट यावर्षी 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये धनुषचा जबरदस्त लूक दिसत आहे. धनुषचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची चित्रपट बघण्याची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे. यापूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता आणि त्याचवेळी चित्रपट कुढल्या महिन्यात रिलीज होणार हे ,सांगण्यात आले होते.

चित्रपटाचा टीझर शेअर करताना मेल्वा सेल्वराज यांनी लिहिले होते की, कर्णनचा टीझर रिलीज करताना खूप आनंद झाला आहे. धनुषचा लूक समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. लोक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरबद्दल सांगायचे झाले तर हा व्हिडिओ ब्लॅक अॅन्ड व्हाइट आहे. यामध्ये एक निर्जनस्थान दाखवण्यात आले आहे.

तेथे कोणीही दिसत नाहीये. एक मोठी टेकडी आहे आणि एक तरूण तलवार हातात घेऊन तिकडे धावत आहे पण नेमका हा तरूण कोण आहे हे सांगणे अवघड आहे कारण यामध्ये पूर्ण अंधार दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती कलाईपुली एस. थानू यांनी केली आहे. धनुष आणि मारी पहिल्यांदाचसोबत काम करणार आहेत.

तिरुनेवलीजवळ घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित हा अ‍ॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन डायरेक्टर लाल आणि नटराजनसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे संगीत संतोष नारायण यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या : 

प्रभासकडून चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट, ‘राधे श्याम’चे टीझर केले शेअर!

अर्जुन कपूरच्या टी-शर्टवर खास संदेश, मलायकाने शेअर केला फोटो !

दोस्तांसाठी कायपण! वरुण धवनच्या पार्टीला मलायकापासून कियाराची हजेरी!

(The first look and date of Karnan movie Dhanush shared on social media)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...