गाडीने मारलेल्या धडकेमुळे ‘द कश्मीर फाइल्स’ फेम अभिनेत्री जखमी

जखमी झाल्यानंतर देखील पल्लवी जोशी यांधी आधी शुटिंग पूर्ण केली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. ‘द कश्मीर फाइल्स’ फेम अभिनेत्री यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

गाडीने मारलेल्या धडकेमुळे ‘द कश्मीर फाइल्स’ फेम अभिनेत्री जखमी
गाडीने मारलेल्या धडकेमुळे ‘द कश्मीर फाइल्स’ फेम अभिनेत्री जखमी
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 8:09 AM

The Vaccine War Pallai Joshi : २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (vivek Agnihotri) आणि पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. विवेक आणि पल्लवी सध्या ‘द वॅक्सीन वॉर’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहेत. सध्या सिनेमाची शुटिंग सुरु आहे. सिनेमाची शुटिंग सुरु असताना पल्लवी जोशी सेटवर जखमी झाल्या आहेत. चाहते पल्लवी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

हैदराबाद येथील फिल्म सीटीच्या सेटवर पल्लवी जखमी झाल्या आहेत. घटनास्थळी असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका गाडीचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडीने पल्लवी जोशी यांना धडक दिली. ज्यानंतर पल्लवी जखमी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘द वॅक्सीन वॉर’ सिनेमाची शुटिंग सुरु झाली आहे.

सिनेमाची शुटिंग सुरु झाल्याची माहिती विवेक अग्नीहोत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. तर दुसरीकडे पल्लवी जोशी यांना गाडीने धडक मारल्यामुळे त्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीने धडक दिल्यानंतर त्या जखमी झाल्या. पण त्यांनी सर्वप्रथम शुटिंग पूर्ण केली आणि त्यानंतर उपचारासाठी गेल्या.

सध्या पल्लवी जोशी यांच्यावर एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पल्लवी जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पल्लवी जोशी यांच्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

पल्लवी जोशी यांनी ‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांचं सर्वच स्थरातून कौतुक झालं. सिनेमात पल्लवी जोशी यांनी एक कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेला न्याय दिला. सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आजही सिनेमाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. जगभरात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३४० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. २०२२ मधील प्रसिद्ध सिनेमांच्या यादीत ‘द कश्मिर फाईल्स’ सिनेमा अव्वल स्थानी होता. आता विवेक अग्नीहोत्री यांच्या ‘द वॅक्सीन वॉर’ सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.