‘द काश्मीर फाइल्स’ : जन्मापेक्षा मृत्यू अधिक पाहिलेल्या काश्मिरी पंडितांचं कटू सत्य

काश्मिरी पंडितांना घरे सोडून वणवण भटकावे लागले. तीन दशकांनंतर याच भयाण, कटू वास्तवावर प्रकाशझोत टाकणारा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट आला आहे. या चित्रपटाने काश्मीरमधील त्या मरणयातनांना वाचा फोडली आहे.

'द काश्मीर फाइल्स' : जन्मापेक्षा मृत्यू अधिक पाहिलेल्या काश्मिरी पंडितांचं कटू सत्य
'द काश्मीर फाइल्स'Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 2:14 AM

नवी दिल्ली : ऋषीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली भूमी म्हणून काश्मीरची ख्याती. काश्मीर (Kashmir) म्हणजे एक स्वर्गच. नद्या, उंच डोंगररांगांनी समृद्ध असलेली ही भूमी. पण 90 च्या दशकाने याच काश्मीरमध्ये अराजकतेचे युग आणले. ‘न भूतो, न भविष्यती’ अशीच दुर्दैवी परिस्थिती ओढवली. अनेक काश्मिरी पंडित मारले गेले, निरागस मुलींवर बलात्कार झाले. काश्मिरी पंडितांना घरे सोडून वणवण भटकावे लागले. तीन दशकांनंतर याच भयाण, कटू वास्तवावर प्रकाशझोत टाकणारा ‘द काश्मीर फाइल्स‘ (The Kashmir Files) हा चित्रपट आला आहे. या चित्रपटाने काश्मीरमधील त्या मरणयातनांना वाचा फोडली आहे. त्या काळात दहशतवादी व कट्टरतावाद्यांनी मिळून 20 हजार काश्मिरी पंडितांची घरे जाळली, 105 शाळा-महाविद्यालये आणि 103 मंदिरे जमीनदोस्त केली. (The Kashmir Files film about the reality of Kashmiri Pandits)

1100 हून अधिक काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या

90 च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या हत्येचे भयानक वास्तव ‘द काश्मीर फाइल्स’मुळे पुन्हा चर्चेत आले आहे. एका आकडेवारीनुसार, त्या काळात 1100 हून अधिक काश्मिरी पंडितांची निर्घृण हत्या करण्यात आली. 1947 पर्यंत काश्मीरमध्ये हिंदू लोकसंख्या 15% होती. ही लोकसंख्या 1981 मध्ये 5 टक्क्यांपर्यंत कमी झाली. 2001 मध्ये काश्मीर खोऱ्यातील हिंदूंची लोकसंख्या 2.77% पर्यंत वाढली, तर 2011 मध्ये ती लोकसंख्या काही प्रमाणात वाढून 3.42 टक्के झाली. फक्त हिंदूंबद्दल बोलायचे झाले तर 2011 मध्ये काश्मीर खोऱ्यात 2.45% हिंदू लोकसंख्या होती. एकट्या श्रीनगरमध्ये 2001 मध्ये 4 टक्के हिंदू होते, ते प्रमाण 2011 मध्ये 2.6 टक्क्यांवर खाली आले आहे. एका आकडेवारीनुसार, आता काश्मीरमध्ये सुमारे 808 काश्मिरी पंडितांची कुटुंबे उरली आहेत. लोकसंख्येचा विचार करता सुमारे साडेतीन हजार काश्मिरी पंडित खोऱ्यात आहेत. काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची व्यथा अस्वस्थ करणारी आहे. मुळात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या मृत्यूचे सत्र 19 जानेवारी 1990 रोजी सुरू झाले नव्हते, तर ते काश्मीर पंडितांवरील अत्याचाराचे शिखर होते.

काश्मिरी पंडितांचा छळ दहा वर्षांपूर्वीच सुरू झाला होता

काश्मिरी पंडितांचा छळ दहा वर्षांपूर्वीच म्हणजेच 1980 मध्ये सुरू झाला होता. 80 च्या दशकाच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण सुरू झाले होते. काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदा बंदुका उगारणाऱ्यांमध्ये सय्यद सलाहुद्दीन आणि यासीन मलिक या दहशतवाद्यांचा समावेश होता. तेव्हा पहिल्यांदाच काश्मीरमधील लोक धर्माच्या नावावर विभागले जाऊ लागले. स्थानिक लोकांच्या मनात विष भरले जात होते. 1987 च्या विधानसभा निवडणुकीत हेराफेरीचे आरोप झाले होते. त्यानंतर मोठ्या संख्येने तरुणांनी शस्त्र हाती घेतले आणि काश्मीरमध्ये नव्वदच्या दशकाचा रक्तरंजित खेळ सुरू झाला. तो रक्तरंजित संघर्ष आजपर्यंत धुमसत आहे. या जिहादने काश्मिरी पंडितांना जिवंतपणीच नरकाच्या आगीत ढकलले होते. 1989 साली काश्मीरमध्ये दहशतवादाचे युग सुरू झाले होते. हिजबुल मुजाहिद्दीन आणि जेकेएलएफने काश्मीरमध्ये जिहाद घोषित केला. त्यानंतर मृत्यूचा तांडव आणि गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला.

काश्मिरी पंडितांना संपवण्याच्या कटात ‘जमात-ए-इस्लामी’

काश्मीरमधील काश्मिरी पंडितांचे अस्तित्व संपवण्याच्या कटात जिहादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’चाही सहभाग होता. या संघटनेने 1989 मध्ये इस्लामिक ड्रेस कोड लागू केला आणि ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही चालते व्हा आणि मरा’ असा नारा दिला. यानंतर काश्मिरी पंडितांनी काश्मीर खोरे सोडण्यास सुरुवात केली. करोडोंचे मालक असलेल्या काश्मिरी पंडितांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी सोडून निर्वासित छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडले गेले. खोऱ्यातील उर्दू वृत्तपत्रांनीही काश्मिरी पंडितांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. काश्मिरी पंडितांच्या घरावर ‘एकतर मुस्लिम बना किंवा काश्मीर सोडा’ अशा धमकीचे स्टिकर्स चिकटवण्यात आले. याचदरम्यान पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी काश्मिरी मुस्लिमांना भारतापासून वेगळे होण्यासाठी चिथावणी देण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत काश्मीरमधील पंडितांना रातोरात सर्वकाही सोडून जावे लागले. काश्मिरी पंडितांची कुटुंबे आजही ती काळी रात्र विसरलेले नाहीत. (The Kashmir Files film about the reality of Kashmiri Pandits)

इतर बातम्या

Tv9 Marathi Poll : द काश्मिर फाईल्स, झुंड, की पावनखिंड… कोणत्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल? जाणून घ्या टीव्ही 9 मराठीचा पोल

‘द काश्मीर फाईल्स’ची IMDb रेटिंग अचानक घसरली; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.