‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माच्या ‘शिव तांडव’ची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी पुन्हा-पुन्हा पाहतायत Video

'द केरळ स्टोरी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिचा एका मंदिरातील व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माच्या 'शिव तांडव'ची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी पुन्हा-पुन्हा पाहतायत Video
Adah SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 3:29 PM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा नुकताच तिचा वाढदिवस साजरा करतेय. वाढदिवसानिमित्त अदाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मंदिरात शंकराच्या भक्तीत लीन होऊन शिव तांडव स्तोत्राचं पठण करताना दिसतेय. यामध्ये अदा शर्माच्या आवाजात शिव तांडव स्तोत्र ऐकायला मिळतंय. ‘माझ्या ऊर्जेचं रहस्य. अशी ऊर्जा जी मला पुष्पगुच्छ आणि फेस बॅन स्वीकारण्याची परवानगी देते. मला स्वीकारल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये अदा शर्मा मंदिरात शिवलिंगसमोर बसून शिव तांडव स्तोत्र म्हणताना दिसतेय. अदाचा 31 वा वाढदिवस तिच्यासाठी फारच खास आहे. तिचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. देशभरात 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं आहे. काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी आणली आहे. त्यात पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू यांचा समावेश आहे. तर काही राज्यांमध्ये त्याला टॅक्स फ्री केलंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

शालिनीच्या भूमिकेबाबत ती एका मुलाखतीत म्हणाली, “शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारताना मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप घाबरले होते. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरु शकत नाही. लोकांना जागरूक करण्यात हा चित्रपट यशस्वी होत आहे याचा मला आनंद आहे. यातून एखाद्याचा जरी जीव वाचला तरी चित्रपट बनवण्याचा उद्देश पूर्ण होईल. जीवनात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करावा. गरज भासल्यास आपल्या ज्येष्ठांचंही मत घेतलं पाहिजे.”

या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं.

‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या वीकेंडला 35.65 कोटी रुपये कमावले होते. आता दुसऱ्या वीकेंडला कमाईचा आकडा आणखी वाढणार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे पुढील काही दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते, असाही अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने वर्तवला आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.