The Kerala Story | अदा शर्माने एका श्वासात म्हणून दाखवली तुफानी कविता; नेटकरी म्हणाले ‘अनन्या, जान्हवीला चॅलेंज द्या’

'सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडेला हे आव्हान दिलं पाहिजे', असं एकाने लिहिलं. तर 'बॉलिवूडला अशी लोकं आवडत नाहीत जे विज्ञान किंवा अभ्यासपूर्ण गोष्टींबद्दल बोलतात', असं म्हणत दुसऱ्या युजरने बॉलिवूड इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.

The Kerala Story | अदा शर्माने एका श्वासात म्हणून दाखवली तुफानी कविता; नेटकरी म्हणाले 'अनन्या, जान्हवीला चॅलेंज द्या'
Adah Sharma Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 11:59 AM

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकळू घालतोय. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्माने दमदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदा शर्माचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना फारच आवडला असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिने एका श्वासान कवितेच्या रुपात रासायनिक घटकांची नावं अशा पद्धतीने म्हणून दाखवली आहेत, जे पाहून पापाराझींसह नेटकरीही भारावले आहेत. केमिस्ट्रीच्या विद्यार्थांना ही रासायनिक घटकांची नावं पाठ करणं किती कठीण असतं हे चांगलंच ठाऊक आहे. मात्र अदा शर्माने न अडखळता भराभर ही नावं म्हणून दाखवली आहेत.

टॉम लेहरेर यांच्या पीरियॉडिक टेबलची कविता तिने गाऊन दाखवली आहे. या व्हिडीओत रासायनिक घटकांची सर्व नावं ती एका लयात म्हणताना दिसतेय. म्युझिकल हार्मोनिस्ट आणि लेक्चरर टॉम लेहरेर यांनी 1959 मध्ये ही कविता तयार केली होती. तीच कविता अदा शर्माने पापाराझींसमोर ऐकवली आहे. तिची स्मरणशक्ती पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ही कविता म्हणून दाखवण्याआधी अदा पापाराझींना मस्करीत म्हणते, “तुम्ही पण शिकून घ्या, पुढच्या वेळी तुम्हालाही गाऊन दाखवायचं आहे.”

हे सुद्धा वाचा

अत्यंत हुशार विद्यार्थ्यांनाही पाठ करताना कठीण जाणारा पीरियॉडिक टेबल अदा शर्माने अत्यंत सहजपणे बोलून दाखवलं आहे. तिच्या तोंडून कविता ऐकल्यानंतर पापाराझीसुद्धा कौतुक करतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. ‘सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडेला हे आव्हान दिलं पाहिजे’, असं एकाने लिहिलं. तर ‘बॉलिवूडला अशी लोकं आवडत नाहीत जे विज्ञान किंवा अभ्यासपूर्ण गोष्टींबद्दल बोलतात’, असं म्हणत दुसऱ्या युजरने बॉलिवूड इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.

पहा व्हिडीओ

याआधीही अदा शर्माचा मराठी कविता बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अदा शर्माचा मराठी अंदाज नेटकऱ्यांना खूपच आवडला होता. ‘खूप छान मराठी बोलता तुम्ही’ असं एकाने लिहिलं होतं. तर ‘आजकाल मराठी कलाकारांना मराठीत बोलायची लाज वाटते, पण तुम्हाला बघून अभिमान वाटतो’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं होतं. काहींनी अदा शर्माकडे मराठी चित्रपटात काम करण्याचीही विनंती केली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.