The Kerala Story फेम अदा शर्मा म्हणते, ‘मी रिलेशनशिपमध्ये आहे, पण…’
'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा हिचं लग्नाबद्दल मोठं वक्तव्य, अभिनेत्रीच्या आयुष्यातील 'ती' खास व्यक्ती कोण?... सध्या सर्वत्र अदा शर्मा आणि तिच्या खासगी आयुष्याबद्दल रंगत आहेत चर्चा...
मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. अनेक ठिकाणी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा विरोध करण्यात आला, तर अनेक ठिकाणी सिनेमाला बॅन देखील करण्यात आलं आहे. पण सिनेमाची चर्चा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सिनेमात अदा शर्मा हिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगत असून अभिनेत्रीच्या अभिनयाचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र अदा शर्मा हिची चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अदा शर्मा हिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवाय अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या खासगी आयुष्याबद्दल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं आहे.
अदा शर्मा कायम तिच्या अभिनेयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. १९२० सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेची देखील तुफान चर्चा रंगली. आजही चाहते १९२० सिनेमातील अदा शर्मा हिला विसरु शकलेले नाहीत. सिनेमात अभिनेत्री भूतनीच्या भूमिकेला न्याय दिला होता. ती भूमिका अदाने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी सर्वात भयानक भूमिका होती. सध्या अभिनेत्री ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे.
दरम्यान, एका मुलखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री म्हणाली होती, ‘मी रिलेशनशिपमध्ये तर आहे.. पण लग्न करणार की नाही माहिती नाही…’ ज्यामुळे अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड कोण आहे? याची तुफान चर्चा रंगली होती. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
अदा हिने ‘1920’ रोजी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अदाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. अदा हिने तलुगू, कन्नड आणि तामिळ सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. सध्या अदा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमासाठी अभिनेत्री तब्बल १ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.
अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अदाच्या लोकप्रियतेत आणि नेटवर्थमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. अदा शर्मा हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे जवळपास १० कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती आहे.
‘द केरळ स्टोरी’ सिनेमात अदा शर्मा हिने शालिनी उन्नीकृष्णन नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. शालिनी उन्नीकृष्णन ही एक हिंदू मुलगी आहे. पण ती एका मु्स्लीम मुलाच्या प्रेमात पडते आणि त्या मुलासोबत निकाह करते. त्यानंतर शालिनी हिचा पती तिला ISIS मध्ये पाठवून देतो.