The Kerala Story |’द केरळ स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; रविवारी थिएटर्समध्ये प्रेक्षकांची गर्दी

या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ज्या ज्या चित्रपटावरून वाद निर्माण झाला किंवा ज्याला प्रदर्शनाआधीच विरोध करण्यात आला, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचा बॉलिवूडचा इतिहासच आहे.

The Kerala Story |'द केरळ स्टोरी'चा बॉक्स ऑफिसवर डंका; रविवारी थिएटर्समध्ये प्रेक्षकांची गर्दी
The Kerala StoryImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 11:19 AM

मुंबई : अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. 5 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी त्यावरून बराच मोठा वाद निर्माण झाला होता. अजूनही काही राज्यांमध्ये या चित्रपटाला विरोध केला जात आहे. मात्र या वादानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेसुद्धा समोर आले आहेत.

‘द केरळ स्टोरी’ची कमाई

या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास 16.60 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा चित्रपट 50 कोटींचा टप्पा सहजरित्या गाठू शकेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. अवघ्या 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच्या कमाईत चांगलीच वाढ झाल्याचं पहायला मिळात आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

शुक्रवार – 8 कोटी रुपये शनिवार – 11.22 कोटी रुपये रविवार- 16.60 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ज्या ज्या चित्रपटावरून वाद निर्माण झाला किंवा ज्याला प्रदर्शनाआधीच विरोध करण्यात आला, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचा बॉलिवूडचा इतिहासच आहे. याआधी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबतही हेच घडलं होतं. इतकंच नव्हे तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानेही वादानंतर तुफान कमाई केली होती. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’लाही वादाचा फायदा झाल्याचं म्हटलं जातंय.

अदा शर्माचं ट्विट-

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला प्रचारकी म्हणणाऱ्यांना अभिनेत्री अदा शर्माने ट्विट करत सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘..आणि जे काही लोक ‘द केरळ स्टोरी’ला अजूनही प्रचारकी चित्रपट असं म्हणत आहेत, अनेक भारतीय पीडितांकडून घटना ऐकूनही असं काही घडलंच नाही असं म्हणत आहेत.. त्यांना माझी नम्र विनंती आहे की गुगलवर फक्त दोन शब्द सर्च करावेत. ISIS आणि ब्राइड्स हे दोन शब्द गुगलवर सर्च करा, कदाचित गोऱ्या मुलींच्या अकाऊंटवर सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतील आणि आपला भारतीय चित्रपट खरा आहे याची प्रचिती येईल’, असं तिने लिहिलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.