The kerala story सिनेमाला ‘या’ दोन कारणांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता; सर्वत्र चर्चांना उधाण

बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांनी कमाई करणाऱ्या 'द केरळ स्टोरी' सिनेमाला मोठा फटका बसण्याची शक्यता, 'या' दोन कारणांमुळे सिनेमाचं होवू शकतं नुकसान

The kerala story सिनेमाला 'या' दोन कारणांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता; सर्वत्र चर्चांना उधाण
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 2:49 PM

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. ५ मे रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी सिनेमाचा विरोध करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. सिनेमाला अनेक ठिकाणी विरोध होत असताना देखील बॉक्स ऑफिसवर मात्र ‘द केरळ स्टोरी’ तगडी कमाई करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. सिनेमाने आतापर्यंत तब्बल ६८.८६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचत असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण १२ मे रोजी आणखी दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. त्यामुळे दोन नवीन सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर ‘द केरळ स्टोरी’ किती रुपयांपर्यंत कमाई करेल यावर सध्या चर्चा रंगत आहे.

१२ मे रोजी ‘छत्रपती’ सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिनेता बेलमकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक व्हीव्ही विनायक यांच्या खांद्यावर होती. ‘छत्रपती’ सिनेमात बेलमकोंडा याच्यासोबत नुसरत भरुचा, शरद केळकर, भाग्यश्री देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेता विद्यूत जामवाल – अनुपम खेर स्टारर IB71 सिनेमा देखील मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. IB71 स्पाय ऍक्शन सिनेमा संकल्प रेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमात विद्यूत जामवाल – अनुपम खेर यांच्यासोबत विशाल जेठवा, दलीप ताहिल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची निर्मिती देखील विद्यूत याने केली आहे.

IB71 आणि ‘छत्रपती’ हे दोन सिनेमे १२ मे रोजी प्रदर्शित झाले आहेत… प्रसिद्ध स्टार कास्ट असणारे दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यामुळे ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला ब्रेक लागेल का? अशा अनेक चर्चा सध्या जोर धरत आहेत..

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.