Bigg Boss 17 | ‘बिग बॉस 17’च्या निर्मात्यांची मोठी खेळी, घरातील सदस्य हैराण
बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी आता मोठा निर्णय घेतलाय. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही आपल्या पतीसोबत सहभागी झालीये.
मुंबई : बिग बॉस 17 मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 (Bigg Boss 17) च्या निर्मात्यांनी देखील हे सीजन हिट करण्यासाठी कंबर कसल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. बिग बॉस 17 ला आता एक आठवडा होऊन गेलाय. इतक्या कमी दिवसांमध्येच घरात मोठे हंगामे झाले. इतकेच नाही तर घरातील सदस्यांमध्ये वाद टोकाला गेले. बिग बॉस 17 चा नुकताच पहिला विकेंडचा वार हा पार पडलाय.
विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसला. इतकेच नाही तर सलमान खान याने ईशाचा खरा चेहरा हा घरातील सदस्यांसमोर आणला. कंगना राणावत ही देखील बिग बाॅसच्या घरात धमाका करताना दिसली. यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाल करताना कंगना राणावत ही दिसली.
बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे सुरू असतानाच आता बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठी खेळी खेळलीये. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत घरातील सदस्यांना चांगलाच धक्का दिल्याचे बघायला मिळतंय. यामुळे घरात मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळाले. बिग बॉस 17 मध्ये आता मोठा धमाका होणार हे नक्कीच आहे.
बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, आता बिग बाॅसच्या घरातील गॅस हा 24 तास सुरू राहणार नाहीये. गॅस फक्त तीन तीन तासांसाठी सुरू राहणार आहे. प्रत्येक रूममधील सदस्यांना त्यांचे जेवण तयार करण्यासाठी फक्त तीन तास मिळणार आहेत. यामुळे घरातील सदस्यांना मोठा धक्का बसलाय. बिग बाॅसने टीआरपी वाढवण्यासाठीच ही खेळी खेळल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
आता याचाच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. बरोबर तीन तासाला घरातील गॅस बंद होताना दिसतोय. प्रत्येक रूममधील सदस्यांसाठी तीनच तास गॅस सुरू राहणार असल्याने घरात मोठे वाद होताना दिसत आहेत. सुरूवातीला बिग बाॅसने घरातील सदस्यांना अनेक सुविधा दिल्या. मात्र, आता बिग बॉस 17 चे निर्माते हे मैदानात आल्याचे बघायला मिळतंय.