AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाला मोठा झटका, चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची दाट शक्यता

आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट आजच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा देखील होती. निर्मात्यांना रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहे. चाहत्यांमध्येही चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळत आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाला मोठा झटका, चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची दाट शक्यता
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 28, 2023 | 5:21 PM
Share

मुंबई : 28 जुलै म्हणजेच आज रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे परत एकदा धमाका करताना आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची जोडी दिसणार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. करण जोहर (Karan Johar) याला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील एक गाणे काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे सूट करण्यात आले. विशेष म्हणजे राहा हिच्या जन्मानंतर पहिल्यांदाच या गाण्याचे शूटिंग करताना आलिया भट्ट ही दिसली होती. याचा एक व्हिडीओ (Video) देखील व्हायरल झाला होता.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करेल असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद हा मिळताना दिसत आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त ठरणार असल्याची जोरदार चर्चा ही सतत रंगत आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या टिमला झटका देणारी एक बातमी पुढे आलीये. रिपोर्टनुसार रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट आॅनलाईन लिक झाला आहे. हा एकप्रकारे चित्रपट निर्मात्यांना मोठा झटकाच असणार आहे. यामुळे रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिसवर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.

रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये फक्त आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हेच नाही तर शबाना आजमी, जया बच्चन आणि धर्मेंद्र हे कलाकार देखील धमाका करताना दिसणार आहेत. चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी मोठे प्रेम हे दिले आहे. आता चित्रपटाकडून देखील मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंह याचा सर्कस हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रोहित शेट्टी आणि चित्रपटाची टिम दिसली होती. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला. यानंतर रोहित शेट्टी याने मोठा खुलासा हा केला होता.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.