Malaika Arjun | हातामध्ये हात घालून निघाले मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर, नेटकरी थेट म्हणाले, मुलाची आणि आईची सुंदर जोडी

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मात्र, अनेकांना मलायका आणि अर्जुन कपूर यांची जोडी अजिबातच आवडत नाही.

Malaika Arjun | हातामध्ये हात घालून निघाले मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर, नेटकरी थेट म्हणाले, मुलाची आणि आईची सुंदर जोडी
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 2:28 PM

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा (Malaika Arjun) ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा पार्ट्यांमध्ये हे दोघेसोबत दिसतात. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे विदेशात सुट्टया घालवण्यासाठी गेले होते. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले होते. विदेशात रस्त्यावर धमाल करताना मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दिसले. नेहमीच मलायका आणि अर्जून हे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर करताना दिसतात.

मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच इंस्टा स्टोरीवर अर्जुन कपूर याचा सेमी न्यूड फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत मलायका हिने लिहिले होते की, मेरा बहुत आलसी बॉय…मलायका अरोरा हिने शेअर केलेला फोटो पाहून अनेकांनी तिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली होती. या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात होत्या.

नुकताच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे मुंबईतील बांद्रा परिसरातील एका हाॅटेलबाहेर स्पाॅट झाले आहेत. डिनर डेटसाठी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बाहेर पडले होते. हाॅटेलमधून बाहेर पडताना मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दिसले. यावेळी मलायका अरोरा ही जबरदस्त लूकमध्ये दिसत होती.

Malaika Arora

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे हाॅटेलच्या बाहेर पडताना एकमेकांच्या हातामध्ये हात घालून निघाले. निळ्या रंगाच्या टि शर्टमध्ये अर्जुन कपूर याचा जबरदस्त असा लूक दिसत होता. आता सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यावर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी थेट म्हटले की, मुलाची आणि आईची जोडी जबरदस्त दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, ही मलायका अरोरा आपल्या मुलाच्या वयाचा असलेल्या अर्जुन कपूर याच्यासोबत फिरत आहेत. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याच्या वाढदिवसाच्या खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मलायका अरोरा खास लूकमध्ये दिसली.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघे लग्न कधी करणार याबद्दल चाहते सतत प्रश्न विचारताना दिसतात. मध्यंतरी एक बातमी होती की, मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई होणार आहे. यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अर्जुन कपूर हा चांगलाच संतापला होता.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.