Video | बाथरूममध्येच सारा अली खान आणि राखी सावंत यांच्यामध्ये भांडणे, ‘या’ कारणामुळे वादाला सुरूवात
बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. सारा अली खान ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सारा दिसते. नुकताच सारा आणि राखी सावंत यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सारा अली खान आणि विका काैशल यांचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सारा अली खान आणि विका हे दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सारा आणि विकीची जोडी थेट राजस्थान (Rajasthan) येथे पोहचली होती. यावेळी सारा अली खान हिने जयपुरमध्ये काही खरेदी देखील केली. सारा अली खान आणि विकी काैशल (Vicky Kaushal) याच्या चित्रपटातील गाणे प्रेक्षकांना तूफान आवडताना दिसत आहे. चित्रपट निर्मात्यांना जरा हटके जरा बचके या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
नुकताच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात विकी काैशल हा कतरिना कैफ हिच्या गाण्यावर डान्स करताना दिसला होता. विकी काैशल याचा डान्स करताना पाहून सारा अली खान ही देखील मस्ती करताना दिसली. सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडताना दिसत आहे.
सध्या सारा अली खान आणि राखी सावंत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे सारा हिनेच हा व्हिडीओ शेअर केला. सारा अली खान हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा बाथरूम बाहेर पडते तर तिला अचानक राखी सावंत ही दिसते. विशेष म्हणजे दोघींचाही ड्रेस एक सारखाच दिसतो.
View this post on Instagram
सारा आणि राखी यांनी लाल रंगाचा ड्रेस घातलेला असतो. सुरूवातीला राखी सावंत हिला पाहून सारा घाबरते. राखी सावंत साराला म्हणते की, मी केक दिसत आहे आणि तु केकवरची चेरी दिसत आहे. यानंतर सारा अली खान थोडा रडका चेहरा करत म्हणते की, तुला पापा लागणार आहे.
पुढे राखी सावंत ही सारा अली खान हिच्या आगामी चित्रपटातील बेबी तुझे पाप लगेगा या गाण्यावर डान्स करताना दिसते. सारा अली खान आणि राखी सावंत या व्हिडीओमध्ये धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे डान्सच्या शेवटी राखी सावंत ही सारा अली खान हिला उचलून घेण्याचा थेट प्रयत्न करते.
राखी सावंत ही साराला उचलून घेते, मात्र यावेळी तिचा तोल जाताना दिसत आहे. आता सारा अली खान आणि राखी सावंत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सारा अली खान ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही मुंबईमध्ये रिक्षाने फिरताना दिसली होती, या व्हिडीओनंतर अनेकांनी तिचे काैतुकही केले होते.