बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने पत्नीला दिलाय देशातील सर्वात महागडा घटस्फोट, रक्कम जाणून व्हाल थक्क

Expensive Divorce : घटस्फोटामुळे 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी झाली मालामाल, देशातील सर्वात महागडा घटस्फोट, पोटगीची रक्कम जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याने पत्नीला दिलाय देशातील सर्वात महागडा घटस्फोट, रक्कम जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 10:58 AM

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : झगमगत्या विश्वात आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत नातं संपवलं. पण काही सेलिब्रीटींचं लग्न तुटल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. बॉलिवूडच्या हँडसम अभिनेत्यांपैकी एक अभिनेता हृतिक रोशन याच्या घटस्फोटानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2000 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हृतिक याने सुझान हिच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्याच्या महिला चाहत्यांना थोडंफार दुःख झालं, पण लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर नव्या जोडप्यावर चाहत्यांनी प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.

हृतिक याच्यासोबत लग्न झाल्यानंतर सुझान हिने दोन मुलांना जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांना सतत कपल गोल्स देणाऱ्या सुझान आणि हृतिक यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला.

सांगायचं झालं तर, 2014 मध्ये सुझान आणि हृतिक यांचा घटस्फोट झाला. दोघांचा घटस्फोट देशातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक आहे. सुझान हिच्यापासून विभक्त होण्यासाठी हृतिक रोशन याला फार मोठी किंमत मोजावी लागली होती. जेव्हा दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा सुझान दोन मुलांची आई होती.

हे सुद्धा वाचा

हृतिक याने घटस्फोटसाठी सुझान हिला तब्बल 380 कोटी रुपयांची पोटगी दिली. घटस्फोटानंतर देखील अनेक ठिकाणी सुझान – हृतिक यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर दोन मुलांसाठी हृतिक आणि सुझान एकत्र येतात. सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील तुफान व्हायरल होत असतात.

घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग देखील वेगळे झाले आहेत. एवढंच नाही तर, दोघांच्या आयुष्यात नव्या प्रेमाची देखील एन्ट्री झाली आहे. सध्या हृतिक अभिनेत्री सबा आझाद हिला डेट आहे. रोशन कुटुंबात सबा हिचं येणं-जाणं देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दोघे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात.

तर दुसरीकडे हृतिक याची पहिली पत्नी सुझान अभिनेता आणि मॉडेल अर्सनाल गोनी याला डेट करत आहे. दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगत असतात. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी देखील सुझान आणि अर्सनाल परदेशात जात असतात. सोशल मीडियावर आजही हृतिक आणि सुझान यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.