पहिल्या पतीसोबत घटस्फोट, दुसऱ्या लग्नाआधी झाली आई, स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री
Actress Life : वयाच्या 9 व्या वर्षी लैंगिक शोषण... दोन वर्षात तुटलं पहिलं लग्न; दुसऱ्या लग्नाआधी दिला बॉयफ्रेंडच्या लेकीला जन्म, आज स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगते 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे 'ही' अभिनेत्री, जिने अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये केलंय काम...
मुंबई | 12 जानेवारी 2024 : इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्ना आधी आई होण्याचा निर्णय घेतला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री कल्की केक्ला (Kalki Koechlin)… कल्की फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, स्पष्ट वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. कल्की हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण खासगी आयुष्यात मात्र कल्की हिने अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी कल्की हिच्या लैंगिक अत्याचार झाले आहे. याचा खुलासा खु्द्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता. एवढंच नाही तर, पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर बॉयफ्रेंडच्या लेकीला जन्म दिल्यामुळे देखील कल्की तुफान चर्चेत आली होती.
कल्की हिने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव डी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये करियरला सुरुवात केली. ‘देव डी’ सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखण अनुराग कश्यप याने केलं. सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच अनुराग आणि कल्की यांच्यात प्रेम बहरलं. अखेर दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं. पण अनुराग आणि कल्की यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर अनुराग आणि कल्की यांनी विभक्त होणाचा निर्णय घेतला. कल्की हिच्यासोबत अनुराग याचं दुसरं लग्न होतं. कल्की आणि अनुराग यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील आज कल्की आणि अनुराग एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात.
पहिल्या घटस्फोटानंतर कल्की हिने दुसरं लग्न करण्याचा विचार केला नाही. पण अभिनेत्री दुसऱ्या लग्नाआधी आई झाली आहे. पहिल्या घटस्फोटानंतर कल्की इस्रायली चित्रकार गाय हर्शबर्ग याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अभिनेत्रीने 2020 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम बॉयफ्रेंड आणि लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
बालपणी काल्की हिच्यावर झालंय लैंगिक शोषण
बालपणी लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता. वयाच्या ९व्या वर्षी तिचे लैंगिक शोषण झालं होतं आणि ती तिच्या आई-वडिलांनाही सांगू शकत नव्हती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कल्की केक्ला आणि तिच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.