चाळिशीपर्यंत देखील नाही जगल्या ‘या’ अभिनेत्री; एकीने वयाच्या १४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एकीने संपवलं स्वःचं जीवन, दुसरीचं रुग्णालयात निधन, तिसरीचं विमान अपघातात निधन... दमदार भूमिकांमुळे 'या' अभिनेत्रींना लोकप्रियता तर मिळाली,चाळिशीपर्यंत देखील नाही जगू शकल्या

चाळिशीपर्यंत देखील नाही जगल्या 'या' अभिनेत्री;  एकीने वयाच्या १४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 2:51 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत देखील नाही जगू शकल्या. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्रीने तर वयाच्या १४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने स्वःचं जीवन संपवलं, तर दुसरीचं रुग्णालयात निधन, तिसरीचं तर विमान अपघातात निधन… ज्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. काही अभिनेत्रींच्या निधनाला अनेक वर्ष लोटली आहेत. पण त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत.

अभिनेत्री दिव्या भारती – दिव्या भारती हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत दिव्या हिने स्क्रिन शेअर केली. चाहत्यांनी दिव्या भारती हिला डोक्यावर घेतलं. पण वयाच्या १९ व्या वर्षी दिव्या भारती हिने स्वतःला संपवलं. तिच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती.

अभिनेत्री स्मिता पाटील – स्मिता पाटील यांनी देखील अनेक सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनोरंजन केलं. पण मुलाला जन्म दिल्यानंतर स्मिता पाटील यांचं निधन झालं. वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री जिया खान – यशाच्या शिखरावर चढत असताना जिया खान हिने टोकाचा निर्णय घेत, स्वतःला संपवलं. ‘गजनी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे जिया हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. जिया हिच्या निधनानंतर अभिनेत्रीच्या आईने लेकीच्या बॉयफ्रेंडवर अनेक गंभीर आरोप केले. अखेर १० वर्षांनंतर जिया खान हिच्या एक्स – बॉयफ्रेंडची निर्दोश मुक्तता झाली.

अभिनेत्री तरुणी सचदेव – महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पा’ सिनेमात स्क्रिन शेअर केल्यानंतर तरुणी सचदेव हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. तरुणी सचदेव हिने वयाच्या १४ व्या अखेरचा श्वास घेतला. तरुणी हिचं विमान अपघातात निधन झालं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

अभिनेत्री तुनिषा शर्मा – टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या हत्येप्रकरणी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खान (Sheezan Khan) वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. तुनिषा हिच्या निधनानंतर अभिनेत्रीच्या आईने लेकीचा एक्स बॉयफ्रेंड शिझान खान याच्यावर गंभीर आरोप केले. वयाच्या २१ वर्षी अभिनेत्रीने स्वतःला संपवलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.