पुढील 3 महिन्यांत बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांना टक्कर देणार ‘हे’ मराठी चित्रपट
कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला. मात्र आता हळूहळू का होईना यातून सावरण्याचा प्रयत्न मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीकडून (Bollywood) होत आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला. याच काळात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनीही (Marathi Movies) त्यांना चांगली टक्कर दिली.
कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला. मात्र आता हळूहळू का होईना यातून सावरण्याचा प्रयत्न मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीकडून (Bollywood) होत आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला. याच काळात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनीही (Marathi Movies) त्यांना चांगली टक्कर दिली. ‘झिम्मा’, ‘पावनखिंड’, ‘मी वसंतराव’ यांसारख्या आशयघन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. अजूनही बरेच मराठी चित्रपट हे प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. 22 एप्रिल रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ आणि ‘धर्मवीर’ या प्रसाद ओकच्या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता आहे.
ऐतिहासिक कथानक असलेला आणखी एक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ असं या चित्रपटाचं नाव आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठीतला हा बिग बजेट चित्रपट आहे. दिग्दर्शक रवी जाधव हे अनन्या या गाजलेल्या नाटकावर आधारित ‘अनन्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. दिव्यांग मुलीची प्रेरणादायी कथा यात दाखवण्यात येणार आहे. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ जाधवचा ‘बालभारती’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले बॉलिवूड चित्रपट-
‘हिरोपंती 2’, ‘रनवे 34’, ‘जयेशभाई जोरदार’, ‘धाकड’, ‘पृथ्वीराज’, ‘शमशेरा’, ‘जुग जुग जियो’, ‘मेजर’, ‘भुलभुलैय्या 2’ हे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.
प्रदर्शनाच्या वाटेवर असलेले मराठी चित्रपट-
चंद्रमुखी, भारत माझा देश, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, इरसाल, अनन्या, समरेणू, एक होतं माळीण हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
हेही वाचा:
Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले