वडिलांच्या विरोधात अभिनेत्री घरातून पळाली, रस्त्यावर झोपली, शारीरिक छळ, आज आहे खासदार
Bollywood Actress Life: वयाच्या 15 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीने वडिलांच्या विरोधात सोडलं घर, अनेक वेदना सोसल्या, रस्त्यावर झोपली, झालेला तो शारीरिक छळ, पण अभिनेत्री आज आहे खासदार आणि 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती

Bollywood Actress Life: अनेक कलाकार त्यांचं अभिनेता, अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेवून मायानगरी मुंबईत येतात. पण इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. एवढंच नाही तर, मुंबई त्यांच्यासाठी नवी असल्यामुळे अनेक संकटांचा त्यांना सामना देखील करावाला लागतो. अशात काहींचे स्वप्न पूर्ण होतात तर काहींचे नाही. बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे. जिने वयाच्या 15 व्या वर्षी वडिलांच्या विरोधात जाऊन घर सोडलं आणि मुंबईत आली. आज ती अभिनेत्री खासदार आणि 4 राष्ट्रीय पुरस्कारांची विजेती आहे.
सध्या ज्या अभिनेत्री चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कंगना रणौत आहे. खुद्द कंगना यांनी त्यांच्या वाईट दिवसांबद्दल सांगितलं आहे. घर सोडल्यानंतर कंगना मुंबईत आल्या. पण त्याचा हा प्रवास फार कठीण होता. सुरुतीला कंगना यांनी देखील मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलचे धक्के खाल्ले आहेत. आज कंगना रॉयल आयुष्य जगत आहेत पण करीयरच्या सुरुवातील कंगना यांनी देखील बस, टॅक्सी, ट्रेनमधून प्रवास केलाय.
कठीण दिवस आणि वाईट दिवसांबद्दल कंगना म्हणाल्या, ‘अनेकांच्या जाळ्यात मी अडकली होती, म्हणून पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. वयाच्या 17 व्या वर्षी वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझं शोषण केलं. व्यक्ती बॉलिवूडमधील होता. मी त्याच्या जाळ्यात अडकली आहे मला कळलं होतं. तुम्हाला वाटतं लोकं तुमच्या मदतीसाठी येत असतात. पण फुकट जेवायला कोणी देत नाही.’




पुढे अभिनेत्री म्हणाल्या, ‘वडिलांच्या वयाच्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर वार केला. मी रक्त बंबाळ अवस्थेत होती. त्या व्यक्ती विरोधात मी तक्रार दाखल केली. पण काहीही झालं नाही. त्याला समज दिली आणि त्याची सुटका झाली…’ कंगना हिने अनेक संकटांचा सामना करत यश मिळवलं आहे. कंगना एका सिनेमासाठी 15 ते 27 कोटी रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर देखील कंगना हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
आज कंगना फक्त अभिनेत्री नसून खासदार देखील आहेत. कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणात प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.