ऑनस्क्रिन वडिलांसोबत अभिनेत्रीला करायचं होतं लग्न, आज 62 व्या वर्षी जगतेय एकटीच
Bollywood Actress Life: 'या' अभिनेत्रीने जेव्हा ऑनस्क्रिन वडिलांसोबत लग्न करण्याची इच्छा केली व्यक्त, म्हणाली, 'तुम्हा जवान असता तर...', आज 62 व्या वर्षी जगतेय एकटीच आयुष्य, सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Bollywood Actress Life: बॉलिवूडची ती दिग्गज अभिनेत्री जिने करीयर सुरुवात अभिनेते सुनील दत्त, फारुक शेख यांसारख्या अभिनेत्यांसोबत केली आणि इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, सेलिब्रिटींमध्ये देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याची क्रेझ होती. या दिग्गज अभिनेत्रीच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलीनेही इंडस्ट्रीत एन्ट्री केली, पण तिला आई सारळं यश मिळवता आलं नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून आभिनेत्री पूनम ढिल्लो आहे.
पूनम हिने 1978 मध्ये ‘यंग इंडिया’ जिंकत ओळख निर्माण केलं. दरम्यान, पूनम हिच्यावर यश चोप्रा पडली आणि पूनम ढिल्लो हिच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला. आजही पूनम हिचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहतात. ‘नूरी’ सिनेमातील पूनम हिने साकारलेली भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. सिनेमात पूनम हिच्यासोबत अभिनेते फारुख शेख मुख्य भूमिकेत होते.
पहिल्याच सिनेमातून यश मिळाल्यानंतर पूनम हिने मागे वळून पाहिलं नाही. ‘लैला’ सिनेमात पूनम हिने दिग्गज अभिनेते सुनील दत्त यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सिनेमात सुनील दत्त यांनी पूमनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तेव्हा अभिनेत्री मोठी इच्छा व्यक्त केली होती.




‘लैला’च्या शूटिंगमधील एक मजेशीर प्रसंग आठवत पूनमने सांगितलं की, शुटिंगच्या सेटवर अभिनेत्रीने सुनील दत्त यांच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मी त्यांना विनोदी अंदाजात म्हणाली होती, तुम्ही जवान असता, तर मी तुमच्यासोबतच लग्न केलं असतं.’
आज कसं आयुष्य जगतेय पुनम ढिल्लो…
इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतरही पूनमच्या अनेक जवळच्या मैत्रिणी आहेत, त्यापैकी एक पद्मिनी कोल्हापुरे आणि रेखा आहेत. पूनमने अभिनेता संजय दत्त याच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. फार कमी वयात पूनमने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
वयाच्या 16 व्या वर्षात अभिनेत्री संसार थाटला. पण अभिनेत्रीचा संसार फार वर्ष टिकला नाही. अभिनेत्रीने अशोक ठाकेरियासोबत लग्न केलं 1998 मध्ये पूनम आणि अशोक यांनी लग्न केलं. पण फक्त 9 वर्ष दोघांचं नातं टिकलं. पूनम आणि अशोक यांना दोन मुलं आहेत. पण घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. वयाच्या 62 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे.