Palak Tiwari | पलक तिवारीमुळे सलमान खानसोबतच्या ‘या’ अभिनेत्रीचं करिअर बर्बाद, शेवटच्या क्षणी…

पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पलक तिवारी हिने किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खान याने पलक तिवारी हिला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले. मात्र, म्हणावी तशी छाप प्रेक्षकांवर सोडण्यात पलकला यश मिळाले नाही.

Palak Tiwari | पलक तिवारीमुळे सलमान खानसोबतच्या 'या' अभिनेत्रीचं करिअर बर्बाद, शेवटच्या क्षणी...
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 10:04 PM

मुंबई : आनंदी या नावाने आपल्या करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री अविका गौर (Avika Gaur) ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. अविका गौर हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. अविका गौर हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये फक्त टीव्ही मालिकांमध्येच नाही तर काही तेलगू चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आता अविका गौर ही तिच्या आगामी 1920: हॉरर्स ऑफ द हार्ट (1920: Horrors of the Heart) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सध्या अविका गौर ही दिसत आहे. फिल्ममेकर विक्रम भट्ट (Vikram Bhatt) यांच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी अविका गाैर हिला मिळाली आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अविका गौर हिने धक्कादायक खुलासा केला आहे. अविका गौरचे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळाले. अविका गौर हिने सांगितले की, सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार होती. तिने चित्रपटासाठी खूप जास्त मेहनत देखील घेतली.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या टीमने तिच्यासोबत संपर्क साधला. त्यानंतर तिला तिच्या भूमिकेबद्दल सांगितले. त्यानंतर अविका गौर हिने चित्रपटाला होकार देखील दिला. आज चित्रपट साईन करायचा असतानाच तिला किसी का भाई किसी की जान चित्रपटाच्या टीमकडून फोन आला आणि तिच्याऐवजी त्या भूमिकेसाठी इतर कोणाला घेतल्याचे सांगितले गेले.

अविका गौर म्हणाली की, मी त्या पात्रासाठी खूप जास्त मेहनत घेत होते. मात्र, चित्रपट साईन करण्याच्या दिवशीच मला त्यांचा काॅल आला आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही इतर व्यक्तीला घेतले आहे. त्यांनी शेवटच्या क्षणी मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत माझ्या ऐवजी पलक तिवारी हिला घेतले. हे माझ्यासाठी खरोखरच खूप जास्त धक्कादायक होते.

पलक तिवारी हिला त्यांनी शेवटच्या वेळी घेतल्याने मला फार धक्का नक्कीच बसला. कारण या मागची काही कारणे देखील मला मुळात माहिती होती. मात्र, हे काय माझ्यासोबत त्यांनी पहिल्यांदाच केले असे अजिबात नाही. यापूर्वीही एका चित्रपटाच्या दरम्यान अशी घटना घडली होती. म्हणजे पलक तिवारी हिच्यासाठी सलमान खान याने अविका गौर हिचा पत्ता चित्रपटातून कट केला. आता अविका हिच्या या धक्कादायक विधानानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.