या हँडसम हंकला आल्या होत्या लग्नाच्या तब्बल 30 हजार मागण्या; आता 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट

या हिरोने जेव्हा इंडस्ट्रीत पदार्पण केलं, तेव्हा तरुणी अक्षरश: त्याच्यामागे वेड्या झाल्या होत्या. त्याच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता आणि या चित्रपटानंतर त्याला लग्नासाठी तब्बल 30 हजार मुलींच्या मागण्या आल्या होत्या.

या हँडसम हंकला आल्या होत्या लग्नाच्या तब्बल 30 हजार मागण्या; आता 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीला करतोय डेट
ओळखलंत का या चिमुकल्याला?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 3:08 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये हँडसम हिरोंची कमतरता नाही. मात्र असा एक हिरो आहे, जो 49 वर्षांचा असून आजही तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. या हिरोने जेव्हा इंडस्ट्रीत पदार्पण केलं, तेव्हा तरुणी अक्षरश: त्याच्यामागे वेड्या झाल्या होत्या. त्याच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता आणि या चित्रपटानंतर त्याला लग्नासाठी तब्बल 30 हजार मुलींच्या मागण्या आल्या होत्या. फोटोतील या चिमुकल्या मुलाला ओळखलंत का? जो सध्या वयाच्या 49 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान अभिनेत्रीला डेट करतोय.

फोटोमध्ये गोड हसणारा हा चिमुकला दुसरा-तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशन आहे. ‘कहो ना प्या है’ या पहिल्या चित्रपटानंतर हृतिकला तब्बल 30 हजार लग्नाच्या मागण्या आल्या होत्या. त्याच्या दिसण्यावर, डान्सवर आणि अभिनयावर तरुणी अक्षरश: फिदा होत्या, किंबहुना आजही आहेत. पहिल्या चित्रपटानंतर हृतिक रातोरात स्टार बनला होता. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द हृतिकने हा किस्सा सांगितला होता.

हे सुद्धा वाचा

हृतिकने सुझान खानशी लग्न केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील ही लोकप्रिय जोडी होती. मात्र या दोघांनी जेव्हा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता सुझान आणि हृतिक आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. एकीकडे सुझान अर्सलान गोणीला डेट करतेय. तर दुसरीकडे हृतिक त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सबा आझादला डेट करत असल्यामुळे चर्चेत आला आहे. इतकंच नव्हे तर अर्सलान आणि हृतिक यांच्यात सुद्धा चांगली मैत्री आहे.

हृतिकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला सुझान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलानसुद्धा आला होता. अर्सलानने याच पार्टीतील हृतिकसोबतचा सेल्फी इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचा हा फोटो रि-शेअर करत हृतिकने लिहिलं होतं ‘थँक्स यारा (मित्र)’. एक्स-वाईफच्या बॉयफ्रेंडशी हृतिकची असलेली मैत्री पाहून नेटकरी अवाक् झाले होते.

हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 12 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.