वडिलांचा तिरस्कार करणाऱ्या या मुलाचं सर्वांत सुंदर पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न, वर्षभरातच घटस्फोट; ओळखलंत का?

फोटोमधील या मुलाला ओळखलंत का? हा केवळ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेताच नाही तर कॉमेडियन आणि डान्सरसुद्धा आहे. चित्रपटांसोबतच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. या अभिनेत्याने पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न केलं होतं.

वडिलांचा तिरस्कार करणाऱ्या या मुलाचं सर्वांत सुंदर पाकिस्तानी अभिनेत्रीशी लग्न, वर्षभरातच घटस्फोट; ओळखलंत का?
फोटोतील या मुलाला ओळखलंत का?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 1:29 PM

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लहानपणीचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. चाहत्यांना आपल्या लाडक्या कलाकारांचे हे फोटो पाहणं खूप आवडतं. काहींच्या लहानपणीचे फोटो पाहून चाहते त्यांना एका क्षणात ओळखतात. तर काहींना त्यांच्या फोटोवरून ओळखणं खूप कठीण जातं. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेत्यासोबतच तो कॉमेडियन आणि डान्सरसुद्धा आहे. तुम्ही याला ओळखू शकलात का?

या फोटोमध्ये दिसणारा मुलगा हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. डान्स रिॲलिटी शो ‘बुगी वुगी’मध्ये परीक्षक म्हणून त्याने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जावेद जाफरी आहे. जावेदने ‘मेरी जंग’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. काहींना हे फार क्वचित माहीत असेल की जावेद जाफरी हा प्रसिद्ध अभिनेते जगदीप यांचा मुलगा आहे. मात्र वडिलांचं दारूचं व्यसन आणि जुगार खेळण्याच्या सवयींमुळे त्रस्त होऊन जावेद त्यांचा तिरस्कार करू लागला होता. बऱ्याच वर्षांनंतर पिता-पुत्राच्या नात्यातील दुरावा हळूहळू मिटला होता.

हे सुद्धा वाचा

जावेद जाफरी त्याच्या दमदार अभिनय आणि कॉमेडीसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. त्याने त्या काळातील प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री जेबा बख्तियारशी लग्न केलं होतं. जेबा ही पाकिस्तानमधील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. तिने ऋषी कपूर यांच्यासोबत ‘हिना’ या चित्रपटात काम केलं होतं. मात्र जावेद आणि जेबाचं लग्न एक वर्षसुद्धा टिकू शकलं नाही. लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर जेबाने प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अदनान सामीशी लग्न केलं. तर दुसरीकडे जावेदने हबीबा जाफरीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटला.

जेबाने वयाच्या 22 व्या वर्षी 1993 मध्ये अदनान सामीशी लग्न केलं होतं. उर्दू मालिका आणि चित्रपटांशिवाय तिने त्याकाळी हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं. जेबाने 1991 मध्ये बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिने रणधीर कपूर दिग्दर्शित आणि निर्मित ‘हिना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. यामध्ये तिने ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलं होतं.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.