मुंबईतील ‘या’ शापित बंगल्यात राहिलेल्या 3 बॉलिवूड सेलिब्रिटींनी सर्वकाही गमावलं; झाले कर्जबाजारी

2014 मध्ये हा बंगला एका उद्योगपतीला 90 कोटी रुपयांना विकला गेला. फेब्रुवारी 2016 मध्ये नवीन मालकाने त्याच्या जागी नवीन मालमत्ता बांधण्यासाठी तो बंगला पाडला. इथेच बॉलिवूडमधल्या तीन मोठ्या सेलिब्रिटींचं घर असलेल्या त्या बंगल्याचा प्रवास संपला.

मुंबईतील 'या' शापित बंगल्यात राहिलेल्या 3 बॉलिवूड सेलिब्रिटींनी सर्वकाही गमावलं; झाले कर्जबाजारी
आशीर्वाद बंगलाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 3:16 PM

मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : मुंबईतील कार्टर रोज हे सध्या शहरातील सर्वांत लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. या परिसरात बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील बरेच सेलिब्रिटी राहतात. पण हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच 1950 च्या दशकात या ठिकाणी पारशी आणि अँग्लो इंडियन समुदायाच्या मालकीचे बंगले होते. त्यावेळी अद्याप बॉलिवूड कार्टर रोडपर्यंत पोहोचलं नव्हतं. पण चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या व्यक्तींच्या मालकीचे दोन मोठे बंगले या परिसरात होते. संगीतकार नौशाद यांच्या मालकीचा ‘आशियाना’ हा बंगला इथे होता. मात्र आज आम्ही तुम्हाला एका दुसऱ्या बंगल्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्याचं नाव गेल्या अनेक वर्षांत बदललं गेलं. तरीही तो बंगला ‘आशीर्वाद’ या नावाने आजही ओळखला जातो.

‘आशीर्वाद’ बंगल्याचं बॉलिवूड कनेक्शन

त्याकाळी हा दोन मजली समुद्रकिनाऱ्याचा देखावा असलेला बंगला एका अँग्लो इंडियन कुटुंबाच्या मालकीचा होता. या बंगल्याचं मूळ नाव कोणाला माहीत नसलं तरी त्याचा पहिला मालक अनेकांना माहीत आहे. 1950 च्या सुरुवातीला अभिनेते भारत भूषण यांनी ही मालमत्ता विकत घेतली आणि नंतर कार्टर रोडवर राहणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटींचा ट्रेंड सुरू झाला. भारत भूषण यांनी 50 च्या दशकात बैजू बावरा, मिर्झा गालिब, गेटवे ऑफ इंडिया आणि बरसात की रात यांसारख्या हिट चित्रपटांमधून चांगलं यश मिळवलं होतं. पण या दशकाच्या अखेरीस त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांना त्यांचा बंगला विकावा लागला होता. त्याचवेळी तो बंगला शापित किंवा पछाडलेला आहे अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. जो कोणी त्या बंगल्यात राहील त्याचं नुकसानच होईल, असं म्हटलं जात होतं.

राजेंद्र कुमार यांनी बंगल्याचं नाव ठेवलं ‘डिंपल’

1960 च्या दशकातील अभिनेते राजेंद्र कुमार यांना या बंगल्याबद्दल समजलं होतं. बंगल्याबद्दल पसरलेली अफवा आणि इतर चर्चांमुळे त्यावेळी तो फक्त 60 हजार रुपयांना उपलब्ध होता. राजेंद्र कुमार यांनी तो बंगला खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम मिळवण्यासाठी बी. आर. चोप्रा यांच्यासोबत तीन चित्रपटांचा करार केला आणि ते तिथं राहायला गेले. त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावावरून बंगल्याचं नाव ‘डिंपल’ असं ठेवलं. मित्र मनोज कुमार यांच्या सांगण्यावरून त्यांनी घरावरील कथित शाप दूर करण्यासाठी पूजासुद्धा केली होती. राजेंद्र यांच्यासाठी तो बंगला भाग्यवान ठरला. कारण नंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. जुबली कुमार म्हणून त्यांची इंडस्ट्रीत ओळख झाली होती. पण भारत भूषण यांच्यासारखंच राजेंद्र कुमार यांनाही कठीण काळाचा सामना करावा लागला. 1968-69 च्या काळात त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि ते आर्थिक संकटात सापडले. अखेर मुख्य भूमिकांवरून सहाय्यक भूमिकांकडे वळताच त्यांना तो बंगला विकावा लागला.

हे सुद्धा वाचा

राजेश खन्ना आणि त्यांचा प्रसिद्ध ‘आशीर्वाद’ बंगला

70 च्या दशकात तो बंगला अभिनेते राजेश खन्ना यांनी विकत घेतला होता. त्यानंतर ते इंडस्ट्रीतील नवीन सुपरस्टार म्हणून ओळखले जाऊ लागले. या दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी सलग 17 हिट चित्रपट दिले होते. त्यांचा ‘आशीर्वाद’ हा बंगला पर्यटकांसाठी जणू आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. सध्या जलसा आणि मन्नत या बंगल्यांची जशी क्रेझ आहे, तशी त्यावेळी आशीर्वाद या बंगल्याची क्रेझ चाहत्यांमध्ये होती. मात्र या बंगल्यातील आधीच्या दोन अभिनेत्यांच्या नशिबाप्रमाणेच राजेश खन्ना यांचंही यश टिकू शकलं नाही. इंडस्ट्रीतील त्यांचं काम कमी होऊ लागलं आणि अमिताभ बच्चन पुढे येऊ लागले होते. त्याचवेळी त्यांची पत्नी डिंपल मुलांना घेऊन त्यांना सोडून गेली. यशानेही राजेश खन्ना यांच्याकडे पाठ फिरवली होती. त्यावेळी राजेश खन्ना यांनी आशीर्वाद या बंगल्यापेक्षा त्यांच्या लिंकिंग रोडवरील ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवण्यासा सुरुवात केली होती. मात्र जवळपास तीन दशकांहून अधिक काळ ते त्या बंगल्यात राहिले होते.

2014 मध्ये हा बंगला एका उद्योगपतीला 90 कोटी रुपयांना विकला गेला. फेब्रुवारी 2016 मध्ये नवीन मालकाने त्याच्या जागी नवीन मालमत्ता बांधण्यासाठी तो बंगला पाडला. इथेच बॉलिवूडमधल्या तीन मोठ्या सेलिब्रिटींचं घर असलेल्या त्या बंगल्याचा प्रवास संपला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.