Sourav Ganguly च्या बायोपिकमध्ये ‘हा’ सुपरहिट अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

अखेर दादाच्या भूमिकेसाठी एका सुपरहिट अभिनेत्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. या बायोपिकच्या शूटिंगलाही लवकरच सुरुवात होणार आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृतरित्या त्या अभिनेत्याची घोषणा केली नाही.

Sourav Ganguly च्या बायोपिकमध्ये 'हा' सुपरहिट अभिनेता साकारणार मुख्य भूमिका
Sourav GangulyImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 9:25 AM

मुंबई : इंडियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीच्या बायोपिकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये सौरवच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनपासून सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत बऱ्याच अभिनेत्यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र अखेर दादाच्या भूमिकेसाठी एका सुपरहिट अभिनेत्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. या बायोपिकच्या शूटिंगलाही लवकरच सुरुवात होणार आहे. निर्मात्यांनी अद्याप अधिकृतरित्या त्या अभिनेत्याची घोषणा केली नाही. मात्र संबंधित अभिनेत्याची वर्णी लावण्यावर सर्व ठीम असल्याचं कळतंय.

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून रणबीर कपूर असल्याचं समजतंय. सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी रणबीरचं नाव कन्फर्म असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. शूटिंग सुरू करण्याआधी रणबीर कोलकाताला जाणार असल्याचंही कळतंय. ईडन गार्डन, कॅब ऑफिस आणि सौरव गांगुलीच्या घरीही तो भेट देणार आहे. त्यानंतर तो शूटिंगची सुरुवात करणार आहे.

सौरव गांगुलीच्या बायोपिकचा आनंद महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांनाही अधिक लुटता येणार आहे. कारण यात त्याचीही भूमिका असेल. मात्र धोनीची भूमिका कोण साकारणार हे अद्याप निश्चित झालं नाही. या बायोपिकसाठी रणबीर कपूरशिवाय इतर कोणत्याही कलाकारांची निवड निश्चित झालं नसल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

सौरव गांगुलीच्या या बायोपिकमध्ये त्याच्या खासगी आयुष्यावरही प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 1983 नंतर गांगुलीने 2003 मध्ये इंडियन क्रिकेट टीमला ICC वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये नेलं होतं. मात्र त्यावेळी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या टीमने पराभव केला होता. त्यावेळी दादा त्याची टीम बनवण्यात यशस्वी ठरला होता.

सर्वोत्कृष्ट इंडियन कॅप्टन्समध्ये सौरवची गणना होते आणि त्याने अनेक नव्या, तरुण खेळाडूंना संधी दिली, असंही म्हटलं जातं. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युवराज सिंह, हरभजन सिंह आणि इरफान पठाण यांचाही समावेश होता.

क्रिकेटपटूंवरील बायोपिक

आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर बायोपिक तयार करण्यात आले असून यातील सुशांत सिंह राजपूतने साकारलेल्या एम. एस. धोनीचा बायोपिक सर्वांत हिट ठरला आहे. तसंच मोहम्मद अझहरुद्दीनचा इम्रान हाश्मीने साकारलेला बायोपिकही चांगला गाजला. सचिन तेंडूलकरच्या जीवनावरही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. तर भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयावर 83 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.