Bollywood | बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर, रज्यात 39 ठिकाणी छापेमारी
Bollywood | ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी, बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार अडचणीत... सर्वत्र चर्चांना उधाण...
मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडारवर आहे. ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. महादेव ऑनलाईन बेटींग ऍपशी सबंधित ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मोठ्या अडचणीत अडकले आहेत. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत… महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचा ईडीला संशय होता. याप्रकरणी आता मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करत ईडीने चौकशी सुरु केली आहे. आता याप्रकणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ईडीकडून मुंबईसह विविध राज्यात ३९ ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ३९ राज्यांमध्ये कोलकाता, रायपूर, छत्तीसगड, भोपाळ राज्यात छापेमारी करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या छापेमारीमध्ये ईडीने ४१७ कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान यांची देखील नावे आहेत.
महादेव ऑनलाईन बेटींग ऍपच्या माध्यमातून परदेशात काही इव्हेंट आयोजित करण्यात आले होते. इव्हेंटमध्ये संबंधित सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी सेलिब्रिटींना मानधन रोख रकमेतून देण्यात आलं होतं. हे सगळे पैसे दोन नंबरचे असल्याचा संशय आहे. हॉटेल बुकिंग इतर पैसे रोख देण्यात आल्याची सध्या चर्चा रंगली आहे.
याप्रकरणात आता १४ सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक सेलिब्रिटी परेशात इव्हेंटला गेले होते. कार्यक्रमासाठी त्यांना पेमेंट देखील करण्यात आलं होतं. येत्या काळात संबंधित सेलिब्रिटींनी ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागू शकतं. लवकरचं सेलिब्रिटींना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येईल अशी माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे या छापेमारीतून काय समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली यांची नावे देखील समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधित सेलिब्रिटींच्या चाहत्यांना देखील मोठी धक्का बसला आहे. आता चौकशीनंतर काय समोर येईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.