‘टायगर जिंदा है’ मधील हसनचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन, 7 वर्षात इतके बदल
Tiger Zinda Hai | 'टायगर जिंदा है' सिनेमात सलमान खान - कतरिना कैफ यांच्यासोबत झळकलेला हसनतं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन, 7 वर्षांनंतर झालेत मोठे बदल, स्वतः सलमान देखील नाही ओळखू शकत..., सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या लूकची चर्चा...
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमा हीट ठरला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली. सिनेमातील सलमान – कतरिना यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण सिनेमात दोघांसोबत दिसलेल्या बालकलाकाराने देखील प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केल. लहान मुलाचं अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. सिनेमात त्याने हसन या भूमिकेला न्याय दिला. त्याचं नाव जिनीत रथ असं आहे. जिनीत याने फक्त सलमान – कतरिना यांच्यासोबत नाहीतर, अनेक सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे.
जिनीत याना सलमान खान याच्यापासून अभिनेता आमिर खान याच्यापर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. आता 7 वर्षांनंतर जिनीत याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जिनीत याची चर्चा रंगली आहे. जिनीत याने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सिनेमांमध्ये काम केल्यानंतर जिनीत याने स्वतःचा मोर्चा संगीताकडे वळवण्याचं समोर येत आहे. जिनीत सध्या किबोर्ड शिकत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने नवीन किबोर्ड देखील खरेदी केला आहे. सोशल मीडियावर जिनीत याचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. 7 वर्षांनंतर जिनीत याचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.
जिनीत याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्याने फक्त ‘टायगर जिंदा हैं’ सिनेमातच नाहीतर, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ सिनेमात देखील काम केलं. त्यानंतर आमिर खान – राणी मुखर्जी यांच्यासोबत ‘तलाश’ आणि ‘गुजारिश’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘एबीसीडी 2’, ‘जाने कहां से आई है’ या सिनेमांमध्ये काम केलं आहे. जिनीत याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
EXCLUSIVE 🔥
HASAN from Tiger Zinda Hai.. who adopted by Tiger And Zoya in the movie is #Pathaan himself 🔥
SPY UNIVERSE 😍#ShahRukhKhan in & as pathaan (Hasan) pic.twitter.com/4ReJ81E74B
— Starboy (@Starboy__02) November 3, 2022
जिनीत याने फार कमी वयात बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं आहे. जिनीत याने सिनेमा, मालिकांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. जिनीत याने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे. रिपोर्टनुसार, जिनीत याने 400 पेक्षा अधिक कमर्शियल जाहिरातींसाठी काम केलं आहे. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.