एक्स-बॉयफ्रेंडने केलेल्या अत्याचारावर अखेर Tina Datta हिने सोडलं मौन; कोण होता ‘तो’?
एक्स-बॉयफ्रेंडकडून Tina Datta हिच्यावर अत्याचार; शिवीगाळ, मारहाणीनंतर पाच वर्षांनी संपवलं नातं
मुंबई : ‘उतरन’ फेम अभिनेत्री टीना दत्त सध्या ‘बिग बॉस 16’ मुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस 16’ मधील दमदार स्पर्धकांपैकी एक म्हणजे टीना. शालिन भनोट याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे टीना अधिक चर्चेत असते. नुकताच झालेल्या ‘विकेंड का वार’ एपिसोडमध्ये शालिनने टीना प्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या, तर दुसरीकडे टीनाने शालिन फक्त माझा मित्र असल्याचं सांगितलं. शिवाय मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही, असं देखील टीना म्हणाली. टीनाच्या या स्पष्टीकरणावर अभिनेता सलमान खानला विश्वास बसला नाही.
त्यानंतर सलमानने खडसावल्यानंतर टीनाने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडबद्दल गार्डन एरियामध्ये भूतकाळातील नात्याबद्दल सांगितलं. एवढंच नाही, तर टीनाने शालिन समोर एक्स-बॉयफ्रेंडबद्दल सर्व काही सांगितलं. टीनाला तिच्या आधिच्या रिलेशनशिपमध्ये अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला.
टीना दत्ता तिच्या भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल म्हणाली, टीना ५ वर्ष एक रिलेशनशिपमध्ये होती. यादरम्यान अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा स्वभाव प्रचंड रागीट झाला होता. एवढंच नाही, तर तो टीनाला मारहाण आणि शिवीगाळ देखील करायचा. त्याने मारहाण केल्यानंतर अभिनेत्री नातं संपवलं.
कोणाचही नाव न घेता टीना म्हणाली, सुरुवातीचा एक वर्ष प्रचंड चांगला होता. त्यानंतर वाद वाढत गेले. टीनाचा पार्टनर तिला शिवीगाळ आणि कानशिलात मारु लागला. भूतकाळातील नातं आठवत शालिन देखील रागीट स्वभावाचा असल्याचं टीनाने सांगितलं.
पुढे टीना म्हणाली, ‘मला त्याने खोटी वचनं दिली आणि रागीट राहिला. मी ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. तो प्रचंड रागीट माणूस होता आणि तू सुद्धा तसाच आहेस. मी इतक्या रागीट माणसासोबत नाही राहू शकत…’ असं टीना शालिनला म्हणाली.
टीनाच्या एक्स बॉयफ्रेंडचं नाव महेश कुमार जायस्वाल आहे. महेश निर्माता आहे. महेशनंतर टीना उद्योगपती परेश मेहता यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता टीना आणि शालिन रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.