TMKOC | ‘तारक मेहता..’च्या ‘दयाबेन’ला खरंच कॅन्सर? अखेर भावाने सोडलं मौन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिशा वकानीला कॅन्सर झाल्याची चर्चा आहे. या चर्चांवर दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता दिशाचा भाऊ मयुर वकानीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

TMKOC | 'तारक मेहता..'च्या 'दयाबेन'ला खरंच कॅन्सर? अखेर भावाने सोडलं मौन
Disha Vakani
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 3:31 PM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीला कॅन्सर झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चर्चांना उधाण आलं आहे. मालिकेत दयाबेनचा पती म्हणजेच जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलिप जोशी यांनी या चर्चांवर नुकतीच प्रतिक्रिया दिली. “मला सकाळपासून सतत फोनकॉल्स येत आहेत. मात्र यावर अद्याप दिशा वकानीने काही उत्तर दिलं नाही. जेव्हा तिच्यापर्यंत या चर्चा पोहोचतील, तेव्हा ती स्वत: चाहत्यांना खरं काय ते सांगेल, अशी मला खात्री आहे”, असं दिलीप जोशी म्हणाले होते. त्यानंतर आता खुद्द दिशा वकानीच्या भावाने या चर्चांवर मौन सोडलं आहे.

मयुर वकानीची प्रतिक्रिया

दिशाचा सख्खा भाऊ मयुर वकानी हा ‘तारक मेहता..’ या मालिकेत ऑनस्क्रीनसुद्धा तिचा भाऊ सुंदरची भूमिका साकारतो. बहिणीच्या कॅन्सरच्या चर्चांविषयी तो म्हणाला, “अशा बऱ्याच अफवा पसरतात आणि त्यात काहीच तथ्य नसतं. तिची प्रकृती ठीक आहे आणि ती ठणठणीत आहे. सोशल मीडियावरील चर्चा खऱ्या नाहीत.”

जेनिफर मिस्त्री काय म्हणाली?

मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनेही दिशाच्या कॅन्सरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी दिशाच्या संपर्कात आहे आणि मला वाटत नाही की या चर्चांमध्ये काही तथ्य असेल. जर असं काही असतं तर मला आधीच समजलं असतं. आम्ही दोघं एकाच परिसरात राहतो. मी तिच्याशी ऑगस्टमध्ये बोलले होते, कारण आम्हाला मुलीच्या कथ्थक क्लासबद्दल बोलायचं होतं. त्यावेळी ती मला एकदम ठीक वाटली. मला वाटतं या फक्त अफवा आहेत.”

हे सुद्धा वाचा

दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत झालेल्या काही बदलांमुळे त्याची लोकप्रियता कमी होत असल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. यात दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी आणि राज अनाडकत, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांचा समावेश होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.