मुलगा म्हणून जन्माला आला, पण लिंगबदलानंतर झाली मुलगी, ‘ती’चं ऐश्वर्या रायसोबत खास कनेक्शन
प्रसिद्ध पुरुष सेलिब्रिटी लिंगबदलानंतर झाली मुलगी, लिंगबदलाची प्रक्रिया ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का, 'ती'चं ऐश्वर्या रायसोबत खास कनेक्शन, आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये तिची देखील होते चर्चा..

लोकप्रिय फॅशन डिझायनर जो पूर्वी स्वप्नील शिंदे या नावाने ओळखला जात होता. 40 वर्षे या नावाने स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, एके दिवशी त्याने अचानक स्वतःची ओळख बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो चर्चेत आला. ट्रान्सवुमन बनल्यानंतर तिने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केलं. पण स्वप्नीलचा हा प्रवास फार वेदनादायी होता. सध्या ज्या फॅशन डिझायनरची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून सायेशा शिंदे आहे. तिला पूर्वी स्वप्निल शिंदे या नावाने ओळखलं जायचं.
अभिनेत्री कंगना राणौतच्या ‘लॉकअप स्टार’ या शोमध्ये तो स्पर्धक म्हणून दिसला होता. तो पुरुष म्हणून जन्माला आला पण त्याच्या आत एक स्त्री जन्म घेत होती आणि नंतर त्याने लिंग बदल निर्णय घेतला. आज सायेशा हे सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे आणि तिचा दर्जा परदेशी प्लॅटफॉर्म मिस युनिव्हर्समध्येही पाहायला मिळाला आहे.
एका मुलाखतीत प्रसिद्ध ट्रांसजेंडर फॅशन डिझायनर सायेशा शिंदे हिने आराध्या – ऐश्वर्या यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सायेशा म्हणाली, ‘माझ्या लिंग बदलाची बातमी कधीही न्यूजपेपरमध्ये आली नाही. काही ठराविक लोकांनाच माझ्या लिंग बदलाबद्दल माहिती होतं. माझं सत्य इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोकांना माहिती होतं. त्यामुळे फिटिंगसाठी जात असताना मी ऐश्वर्या हिच्या मॅनेजरला सांगितलं होतं, स्वप्नील हा नाही येणार नाही तर, सायेशा येणार आहे. ही गोष्ट मी ऐश्वर्या हिच्या मॅनेजरला सांगितली होती. कारण समोर आल्यानंतर कोणाल धक्का बसायला नको…’




पुढे सायेशा म्हणाली, ‘ऐश्वर्या हिने मला आदर आणि सन्मान दिला. पूर्ण वेळ ऐश्वर्या मला फक्त सायेशा नावाने हाक मारत होती. एवढंच नाही तर, मुलगी आराध्या त्याठिकाणी आल्यानंतर ऐश्वर्या हिने आराध्यासोबत माझी ओळख सायेशा म्हणून करुन दिली…’ ऐश्वर्या हिने ज्याप्रमाणे स्वप्निल पासून सायेशा झालेल्या फॅशन डिझायनरला प्रेम दिलं, ते पाहून सायेशा प्रचंड भावुक झाली.
वेदनादायी होता लिंगबदलाचा प्रवास
मुलगा असताना मुलगी होणं सायेशासाठी फार कठीण होतं. वयाच्या 40 व्या वर्षी सायेशा हिने लिंग बदलाचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सायेशाने लिंग बदलाची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनीही तिचा निर्णय मान्य केलं. प्रदीर्घ शस्त्रक्रियेनंतर सायशाला नवीन आयुष्य मिळालं. नुकताच, सायेशा हिने योनी प्रत्यारोपण बद्दल माहिती दिली. या दरम्यान सायेशा हिने असह्य वेदना सहन केल्या.
कोण आहे सायेशा शिंदे?
प्रसिद्ध फॅशन डिझायनर सायेशा शिंदे हिले अनेक जण स्वप्निल शिंदे म्हणून ओळखतात. सायेशा एक ट्रांसजेंडर महिला आहे. सायेशा हिने सामाजाची पर्वा न करता फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि सायेशा शिंदे म्हणून स्वतःची ओळख निर्माणे केली. वयाच्या 40 व्या सायेशा हिने स्वतःचा स्वीकार ट्रांसजेंडर महिला म्हणून केला.