Anushka Sharma हिच्या भावासोबत ब्रेकअप, आता प्रसिद्ध उद्योजकाला डेट करते तृप्ती डिमरी?

Tripti Dimri : अनुष्का शर्मा हिच्या भावाची साथ सोडून, आता 'या' प्रसिद्ध उद्योजकाला डेट करते तृप्ती डिमरी? दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल... तृप्ती डिमरी हिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठी गोष्ट अखेर समोर

Anushka Sharma हिच्या भावासोबत ब्रेकअप, आता प्रसिद्ध उद्योजकाला डेट करते तृप्ती डिमरी?
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 12:33 PM

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : ‘ॲनिमल’ सिनेमात झोया या भूमिका साकारत प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) हिच्या चाहत्यांच्या संख्येत फार मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात तृप्ती हिने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत इंटिमेट सीन दिले आहेत. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. दरम्यान, तृप्ती हिच्या फक्त प्रोफेशनल नाही तर, खासगी आयु्ष्याबद्दल देखील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अभिनेत्री कोणाला डेट करत आहे याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. तृप्ती डिमरी एका प्रसिद्ध आणि गडगंज श्रीमंत उद्योजकाला डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडसोबत एक फोटो देखील तुफान व्हायरल होत आहे.

एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही, बॉयफ्रेंडमुळे चर्चेत होती. आता अभिनेत्री एका उद्योजकाला डेट करत आहे. पण रिपोर्टनुसार, तृप्ती हिने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा भाऊ कर्नेश शर्मा याला देखील डेट केलं आहे. अभिनेत्रीने कर्नेश याच्या प्रॉडक्शन अंतर्गत सिनेमा ‘बूलबूल’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यानंतर दोघांनी ‘कला’ सिनेमात देखील कान केलंय

हे सुद्धा वाचा

कर्नेश आणि तृप्ती यांना अनेक सिनेमांमध्ये देखील एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघांचे खासगी फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण कर्नेश याच्यासोबत तृप्ती हिचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यापूर्वी तृप्ती आणि कर्नेश याचं ब्रेकअप झालं.. पण आता तृप्ती हिच्या नावाची चर्चा एका गडगंज श्रीमंत उद्योजकासोबत होत आहे.

सध्या तृप्ती हिच्या रिलेशनशिपची चर्चा उद्योजक सॅम मर्चेंट (Sam Merchant) यांच्यासोबत होत आहे. नुकताच एका कार्यक्रमात अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत पोहोचली होती. कार्यक्रामात दोघांना एकत्र स्पॉट केल्यामुळे सॅम – तृप्ती यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण तृप्ती हिने यावर अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

तृप्ती आणि सॅम यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार अद्याप केलेला नाही. सांगायचंझालं तर तृप्ती ‘ॲनिमल’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.