तृप्ती डिमरी सोबत दिसणारा मिस्ट्री मॅन कोण? ‘नो मेकअप’ लूकमध्ये दिसली भाभी 2
Triptii Dimri | तृप्ती डिमरी हिचा 'नो मेकअप लूक' आणि तिच्यासोबत असलेल्या 'मिस्ट्री मॅन'ची सर्वत्र चर्चा... 'तो' व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांना बसला धक्का..., गेल्या काही दिवसांपासून तृप्ती कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्तेच असते. आता देखील अभिनेत्रीला एका पुरुषासोबत स्पॉट करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे...
अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली. सिनेमामुळे तृप्ती हिला नवी ओळख मिळाली. नॅशनल क्रश म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली तृत्ती आता एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री एका मेस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीच्या ‘नो मेकअप’ लूकने देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
तृप्ती हिच्यासोबचत दिसणरा पुरुष दुसरा तुसरा कोणी नसून, बॉयफ्रेंड सॅम मर्चंट आहे. अभिनेत्री सॅम याच्यासोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या तृप्तीला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. सध्या सोशल मीडियावर सॅम आणि तृप्ती यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत एका मॉलमधून बाहेर येताना दिसत आहे. तृप्ती डिमरी हिने मॉस-हिरव्या टी-शर्टसह बॅगी ट्राउझर्स, पांढरी चप्पल घातली होती. अभिनेत्रीला नो मेकअप लूकमध्ये स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, हातात कॉफीचा कप घेऊन तिने पोज देखील दिल्या. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
तृप्तीचा आगामी सिनेमा…
तृप्ती डिमरी हिच्या आगामी सिनेमाचं नाव ‘बॅड न्यूज’ असं आहे. विकी कौशल, तृप्ती डिमरी स्टारर सिनेमा 19 जुलै 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा पोस्टर देखील प्रदर्शित झाला आहे. पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनामाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बॅड न्यूज’ सिनेमातून तृप्ती आता चाहत्यांचं किती मनोरंजन करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी स्टारर ‘मॉम’ आणि त्यानंतर ‘पोस्टर बॉयज’ सिनेमात छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर अभिनेत्रीने ‘लैला मजनू’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. तृप्ती हिला ‘ॲनिमल’ सिनेमामुळेच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. सिनेमात अभिनेत्रीचे अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत इंटिमेट सीन होते.