तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंसूरचा माफीनामा; म्हणाला ‘तुझ्या लग्नात तुला आशीर्वाद..’

'लियो' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता मंसूर अली खानने अभिनेत्री तृषा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आधी माफी मागण्यास तयार नसणाऱ्या मंसूरने अंतरिम जामिनाची याचिका फेटाळताच माफी मागितली आहे.

तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मंसूरचा माफीनामा; म्हणाला 'तुझ्या लग्नात तुला आशीर्वाद..'
अभिनेत्री तृषा कृष्णनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 3:24 PM

मुंबई : 24 नोव्हेंबर 2023 | ‘लियो’ या दाक्षिणात्य चित्रपटातील दोन सहकलाकार मंसूर अली खान आणि तृषा कृष्णन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने मंसूर यांच्यावर सर्वच बाजूंनी टीका झाली होती. इतकंच नव्हे तर त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली. मंसूर यांच्या टिप्पणीनंतर भविष्यात कधीच त्यांच्यासोबत काम करणार नसल्याचा निर्णय तृषाने घेतला. आधी मंसूरने त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता. आता सेशन कोर्टात त्याच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेला फेटाळण्यात आलं आहे. त्यानंतर त्याचे सूर बदलले आहेत आणि त्याने माफी मागितली आहे.

मंसूर अली खानने अखेर तृषाची माफी मागितली. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मंसूरने लिहिलंय, ‘माझी सहकलाकार तृषा, मला माफ कर. देवाने मला ही संधी द्यावी की मी तुझ्या लग्नात तुला आशीर्वाद देऊ शकू. आमीन.’ मंसूरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

मंसूर अली खानला तृषासोबत चित्रपटात एक सीन करायचा होता. याविषयी तो म्हणाला, “जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. मी तिला बेडरुममध्ये घेऊन जाईन, जे मी आधीही अनेक अभिनेत्रींसोबत केलं आहे. मी याआधीही बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. यामध्ये नवीन असं काहीच नाही. मात्र काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना मला तृषाला पहायलासुद्धा दिलं गेलं नाही.”

हे सुद्धा वाचा

तृषाचं सडेतोड उत्तर

मंसूरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. अनेकांनी त्याच्यावर टीका केली. तृषानेही मंसूरच्या व्हिडीओवर सडेतोड उत्तर दिलं होतं. तिने लिहिलं, ‘नुकताच एक व्हिडीओ माझ्या निदर्शनास आला, ज्यामध्ये मंसूर अली खान माझ्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि वाईट भाषेत बोलताना दिसत आहे. मी याचा तीव्र विरोध करते. त्याची ही टिप्पणी स्त्रीविरोधी, अपमानजनक, अत्यंत वाईट आणि तिरस्कार करण्याजोगी आहे. त्याने माझ्यासोबत काम करण्याची स्वप्न पाहत राहावी पण त्याच्यासारख्या बेकार व्यक्तीसोबत मी स्क्रीन शेअर केला नाही यासाठी मी खूप आभारी आहे. माझ्या उर्वरित करिअरमध्येही मी त्याच्यासोबत कधी काम करणार नाही. त्याच्यासारखे लोक माणुसकीला वाईट ठरवतात.’

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.