‘तू झूठी मैं मक्कार’ची बंपर ओपनिंग! अवघ्या काही तासांत कोट्यवधींची कमाई; रणबीर-श्रद्धाची जोडी हिट

तू झूठी मैं मक्कार हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून त्यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोघं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. यामध्ये डिंपल कपाडियाचीही भूमिका आहे.

'तू झूठी मैं मक्कार'ची बंपर ओपनिंग! अवघ्या काही तासांत कोट्यवधींची कमाई; रणबीर-श्रद्धाची जोडी हिट
Tu Jhoothi Main Makkaar Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 2:58 PM

मुंबई : महिला दिनाच्या मुहूर्तावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र ॲडव्हान्स बुकिंग चांगली झाल्याने पहिल्या दिवशी चित्रपटाची बंपर कमाई होतेय. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही तासांनंतर कमाईचे आकडे समोर येत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने सकाळी 10.30 वाजेपर्यंत किती कमाई झाली, याची माहिती दिली आहे. त्याच्या मते प्रदर्शनाच्या दिवशी सकाळी 10.30 वाजेपर्यंत ‘तू झूठ मैं मक्कार’ या चित्रपटाने जवळपास 2.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. नॅशनल चेन्सचे हे आकडे आहेत. या चित्रपटाने पीव्हीआरमध्ये 1.23 कोटी रुपये, आयनॉक्समध्ये 70 लाख रुपये आणि सिनेपोलीसमध्ये 42 लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

पहिल्याच दिवशी बंपर कमाई

चित्रपटाच्या कमाईचे हे आकडे फक्त तीन सिनेमा चेन्सचे आणि सकाळी 10.30 वाजेपर्यंतचे आहेत. त्यामुळे संपूर्ण दिवसांत आणखी दमदार कमाई होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लव रंजनने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टिटू की स्विटी यांसारखे त्याचे रोमँटिक कॉमेडी चित्रपट हिट ठरले आहेत. रणबीर आणि श्रद्धासोबत मिळून आतासुद्धा त्याने अशीच काहीशी कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

हे सुद्धा वाचा

‘पठाण’च्या कमाईला लागणार ब्रेक

शाहरुख खानच्या पठाणसोबत आणि त्यानंतर प्रदर्शित झालेले चित्रपट फार दिवस थिएटरमध्ये टिकू शकले नाहीत. यात गांधी गोडसे, शहजादा, सेल्फी या चित्रपटांचा समावेश आहे. मात्र पठाण हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून राहिला. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड आपल्या नावे केल्यानंतर आता त्याच्या कमाईला ब्रेक लागणार असल्याचं दिसतंय.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटात रणबीर आणि श्रद्धासोबतच डिंपल कपाडिया, बोनी कपूर, अनुभव सिंह बस्सी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.