‘तुम्बाड’चं शूटिंग झालेली महाराष्ट्रातील रहस्यमयी, भितीदायक जागा, तिथे आहे मोठा खजिना
Tumbbad Film Shooting Locations: रहस्यमयी, भितीदायक जागा, मोठे बंगले आणि कधीही कोसळणारा मुसळधार पाऊस... ‘तुम्बाड’चं झालेली महाराष्ट्रातील भयानक जागा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'तुम्बाड' सिनेमाची चर्चा
Tumbbad Film Shooting Locations: कल्ट हॉरर सिनेमा ‘तुम्बाड’ 13 सप्टेंबर म्हणजे आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सांगायचं झालं तर सिनेमा 2018 मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला होता. आता निर्मात्यांनी पुन्हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर प्रतीक्षा देखील करत आहे. सिनेमातील अनेक सीन भयानक असून रहस्यमयी जागांवर शूट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याच सीनकडे प्रेक्षकांचं दुर्लक्ष झालं नाही.
‘तुम्बाड’ सिनेमा जितका रहस्यमय आहे, त्याचे शूट लोकेशनही तितकेच रहस्यमय आहे. ‘तुम्बाड’ सिनेमाबद्दल काही अशा गोष्टी आहे, ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाच्या शूटिंगसाठी निर्माते अशा जागेच्या शोधात होते जे थोडे रहस्यमय वाटेल.
तुम्बाडच्या शूटिंगसाठी असं ठिकाण निवडण्यात आले, जिथं गेल्या 100 वर्षांपासून कोणीही शूटिंग करण्याचा विचार देखील केला नव्हता. तुम्बाड सिनेमाची शुटिंग ज्या ठिकाणी झाली त्याठिकाणी तुम्ही सुट्ट्यांमध्ये फिरायला देखील जाऊ शकता.
तुम्बाड गावात झाली सिनेमाची शुटिंग
‘तुम्बाड’ सिनेमाची शूटिंग महाराष्ट्रातील तुम्बाड गावात झाली आहे. पुण्यापासून हाकेच्या अंतरावर हे गाव आहे. या गावाबाबतही अनेक रहस्ये आहेत. तुम्बाड गावात अनेक ठिकाणी खजिना असल्याचं येथील स्थानिक लोक सांगतात. पण हा खजिना कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही.
एवढंच नाही तर, याबद्दल बोलणं देखील येथील लोकं टाळतात. सिनेमात एक सीन आहे, जेव्हा मुसळधार पाऊस बरसत असतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे ‘तुम्बाड’ गावात असा मुसळधार पाऊस कायम होत असतो.
View this post on Instagram
सिनेमात एक बंगला दाखवण्यात आला आहे, तो बंगला आजही अस्थित्वात आहे. बंगला महाराष्ट्रातील पालघर येथील स्थित वाडा येथे आहे. बंगला 1703 मध्ये बांधण्यात आला आहे. मात्र, इथे फिरायचं असल्यास परवानगी घ्यावी लागते. सरदार अंबाजी पुरंदरे यांच्यासाठी बंगला बांधण्यात आला होता. या बंगल्यात एक गणपती मंदिरही आहे.
तुम्बाड सिनेमाचं शुटिंग महाराष्ट्रातील सासवड, महाबळेश्वर ठिकाणी झालं आहे. महाबळेश्वर हे लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. मात्र, जर तुम्ही कधी महाराष्ट्रात फिरण्याचा विचार करत असाल तर तुंबड गावाला नक्की भेट द्या.
तुम्बाड येथे कसं पोहोचाल?
तुम्बाडला जाण्याचा विचार करत असाल तर कोकण रेल्वे उत्तम पर्याय आहे. अंजनी स्टेशनपासून तुम्बाड हे गाव 8 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही रस्त्याने जात असाल, तर तुम्ही बॉम्बे-गोवा महामार्गाने (NH66) देखील जाऊ शकता.