शिझान – तुनिशाचा मेकअप रुममधील खास व्हिडीओ; पाहुन तुम्हीही व्हाल भावुक
अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंड शिझान सोबत मेकअप रुममधील जुना व्हिडीओ व्हायरल
Tunisha Sharma Death Case: अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्ये प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी तुनिशाने गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. बॉयफ्रेंड शिाझान खानच्या (Sheezan Mohammed Khan)मेकअप रुममध्ये तुनिशाने अखेरचा श्वास घेतल्यामुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. दुपारी तीन वाजता दोघांनी जेवण केलं आणि 03:15 मिनिटांनी अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केली. सध्या याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, शिझान आणि तुनिशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिझान आणि तुनिशा मेकअप रुममध्ये आनंदी क्षण जगताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शिझान तुनिशासाठी ‘तेरे लिए’ गाणं गाताना दिसत आहे.
तुनिशाच्या आत्महत्येनंतर हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खुद्द शिझानने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये, ‘काही मेकअप रुम सेशल तुनिशा शर्मासोबत…’ असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
तुनिशाने मेकअप रुममध्ये घेतला अखेरचा श्वास… तुनिशा शनिवारी सकाळी उत्साहात मालिकेच्या सेटवर पोहोचली होती. पहिली शिफ्ट संपवल्यानंतर शिझान आणि तुनिशाने दुपारी तीन वाजता एकत्र जेवण देखील केलं. पण त्या 15 मिनिटांमध्ये असं काय झालं, ज्यामुळे तुनिशाने 03:15 मिनिटांनी गळफास लावून आयुष्य संपवलं. या गोष्टीचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
तुनिशा आत्महत्या प्रकरणी अभिनेत्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस चौकशीमध्ये श्रद्धा वालकर हत्याप्रकरणानंतर शिझान हैराण होता आणि म्हणून त्याने तुनिशासोबत असलेलं नातं संपवलं असल्याचं समोर येत आहे. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तुनिशाचं बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.